आली असेल सोंगायला तर सोंगुन घ्या सोयाबीन! आज थोडाफार पाऊस! पुढील ५ दिवस हवामान कोरडे; जिल्हा कृषी हवामान केंद्राचा शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सल्ला....
Oct 3, 2023, 15:36 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोयाबीन पीक परिपक्व झाले असेल तर कापून घ्या, जेणेकरून शेंगा फुटून दाणे खाली पडणार नाहीत आणि उत्पादनात घट होणार नाही असा महत्वपूर्ण सल्ला जिल्हा कृषी हवामान केंद्राने दिला आहे. कारण, पुढील ५ दिवस हवामान कोरडे असणार आहे.
भारतीय हवामान खात्याने आज वर्तवलेल्या ५ दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलडाणा जिल्ह्यात आज,३ सप्टेंबरला तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. पुढील ५ दिवस मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कोरडे हवामान राहणार असल्याने सोंगायला आलेली सोयाबिन सांगून घेणे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरेल.
रब्बी हंगामाची तयारी करीत असताना रब्बी ज्वारीची पेरणी करतांना जमिनीतील पुरेश्या ओलाव्याची खात्री करावी. रब्बी पिकांसाठी जमिनीची मशागत करताना ओलावा टिकून राहील अशी मशागत करावी असे आवाहन जिल्हा कृषी हवामन केंद्र व जिल्हा कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.