अतिवृष्टीमुळे नुकसानीचे अर्थसहाय जमा करण्यास सुरूवात! जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले "हे" आवाहन...

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यामध्ये विविध कालावधीत सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे  झालेल्या नुकसानीची मदत लाभार्थ्यांना थेट बँक खात्या जमा करण्यात येत आहे. लाभार्थी हस्तांतरण प्रणाली मार्फत बॅंक खात्यात अर्थसहाय्य जमा करण्यात येऊन लाभ देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

डिसेबर २०२१ मध्ये जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत खामगाव तालुक्यातील, ऑक्टोबर २०२१ मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीबाबत, तसेच जून ते ऑक्टोबर २०२२ मध्ये जिल्ह्यात सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे झालेल्या नुकसानीबाबत आणि एप्रिल २०२३ मध्ये जिल्ह्यात अवेळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीमुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना डीबीटीप्रणालीमार्फत शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यात अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे.

ई-केवायसीमुळे सदर मदत तात्काळ लाभार्थांच्या बँक खात्यात डीबीटीप्रणाली मार्फत जमा करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. ई-केवायसीबाबत लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक तहसिल कार्यालयामध्ये मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तसेच लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नसल्यास त्यांनी महा ई-सेवा केंद्रात ई-केवायसी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.