मोठी बातमी! घाटाखाली पावसाची धुवांधार बॅटिंग! जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्याचा संपर्क तुटला!

शेगाव वरवट रस्त्यावरील पुलावरून दोन फूट पाणी; आलेवाडीत घरात पुराचे पाणी घुसले, अन्नधान्याची नासाडी,नागरिकांनी घरे सोडून घेतली आश्रयासाठी धाव..
 
Water
शेगाव(ज्ञानेश्वर ताकोते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोनच दिवसांपूर्वी पावसाने अक्षरशः झोडपून काढलेल्या जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांना २१ जुलैच्या रात्री पावसाने पुन्हा धुतले. त्यामुळे रात्र आणि आजची सकाळ दोन्ही तालुक्यांसाठी जलमय ठरली. रात्री झालेल्या पावसाने अनेक गावांतील छोट्या नाल्यांना, नद्यांना पूर आलाय. काही गावांत पाणी घुसले आहे. जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटला असून शेगाव वरवट रस्त्यावरील कालखेल येथील पुलावरून वाहतूक बंद असल्याने रस्ता बंद आहे. त्यामुळे शेगावचा संग्रापुरशी संपर्क तुटला आहे.
Water
 दोनच दिवसांपूर्वी शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्यांत अतिवृष्टी झाली होती. रात्री पुन्हा अतिवृष्टी सदृष्ट पाऊस पडला. अद्याप पावसाचा जोर कमी झालेला नाही. अधून मधून जोरदार सरी बरसत असून संततधार रिमझिम सुरू आहे. संग्रामपूर तालुक्यातील २० ते २५ गावांत पावसाचे पाणी घुसले आहे. जळगाव जामोद संग्रामपूर रस्त्यावरील विविध नद्या नाल्यांना पुर आल्याने तो रस्ता बंद आहे. सोनाळा, बावनबीर, वासाडी या गावांच्या मध्ये असलेल्या नदीला पुर असल्याने गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. सातपुड्यातील जवळपास सर्वच नंद्या नाल्यांना पूर आला आहे. 
संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी येथील नदीकाठच्या घरात पाणी शिरल्याने अन्नधान्य व घरांचे मोठे नुकसान झाले, लोकांना स्वतःची घरे सोडून इतर ठिकाणी आश्रय घ्यावा लागत आहे.