शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ! उद्यापासून ४ दिवस बुलडाणा जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस; जिल्हा कृषी हवामान केंद्राने दिली "गुड न्युज"! संपूर्ण अंदाज पाहण्यासाठी बातमी वाचा..

 
Rain
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा कधी नव्हे तेवढा यंदा दुष्काळाच्या सावटात आहेत. जिल्ह्यात घाटाखाली जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात झालेली जीवघेणी अतिवृष्टी वगळता पिकांसाठी समाधानकारक पाऊस झाला नाही. पावसाळ्यातला शेवटचा महिना सुरू असला तरी अद्याप जिल्ह्यातील धरणे कोरडीच आहेत, त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा तिवर झाल्या आहेत. मात्र आज,५ सप्टेंबरच्या मुहूर्तावर जिल्हा कृषी हवामान केंद्राने बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. उद्या,६ सप्टेंबरपासून जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
   
भारतीय हवामान खात्याने आज वर्तवलेल्या ५ दिवसीय हवामान अंदाजानुसार ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा होईल. शिवाय ७ व ८ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल असे हवामान विभागाने म्हटले आहे.
  ६ ते ८ सप्टेंबर या ३ दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची देखील शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटल्याचे जिल्हा कृषी हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ मनीष येदुलवार यांनी "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना सांगितले.
पिकांनी पाणी द्यायचे नियोजन केले असेल तर...
दरम्यान येत्या ४ दिवसांत जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्याचे नियोजन केले असल्यास ते पुढे ढकलावे. उडीद मूग या पिकांची कापणी केली असल्यास पीक पावसाने खराब होऊ नये म्हणून झाकून ठेवावे असे आवाहन मनीष येदुलवार यांनी केले आहे.