GOOD NEWS बाप्पा आणि गौराई पावल्या!बुलडाणेकरांची चिंता मिटणार! येळगाव धरणात ७० टक्के जलसाठा; आवक सुरूच.. संध्याकाळपर्यंत १०० टक्के भरण्याची शक्यता...
Sep 22, 2023, 10:31 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): यंदा बुलडाणेकरांसमोर भीषण जलसंकट उभे राहिले होते..पावसाळा संपत आला तरी धरणात पाण्याची आवक नसल्याने धरणातील पाण्याने तळ गाठला होता. भर पावसाळ्यात धरणातील पाण्याची पातळी १५ टक्क्यांपर्यंत खाली आली होती..मात्र आता अखेर ही चिंता मिटण्याच्या मार्गावर आहे. कालपासून झालेल्या दमदार पावसाने आज सकाळपर्यंत धरणार ७० टक्के जलसाठा झाला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा पैनगंगेचे पात्र दुथडी भरून वाहिले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची चांगली आवक सुरू आहे. याच गतीने आवक सुरू राहिल्यास आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत येळगाव धरण १०० टक्के भरण्याची शक्यता आहे.