दिलासादायक बातमी! आजपासून जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन! जिल्ह्यात सार्वत्रिक बरसणार! १९ सप्टेंबर पर्यंत पाणीच पाणी...
भारतीय हवामान विभागाच्या वतीने जिल्हा कृषी हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात आज,१५ व १६ सप्टेंबरला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा सार्वत्रिक पाऊस होणार आहे. याच दोन दिवसांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसासह विजांचा गडगडाट होणार असल्याचेही संकेत आहे. त्यानंतर १७ ते १९ सप्टेंबर या ३ दिवसात जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलाय हा सल्ला...
मुग, उडीद पिकांची कापणी झाली असल्यास संबंधित शेतमाल संभाव्य पावसाने खराब होऊ नये म्हणून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याची ताबडतोब व्यवस्था करावी.कपाशी,तुर, सोयाबीन पिकातील फवारणीची, आंतरमशागतीची कामे पाऊसमान लक्षात घेऊन करावी.तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पावसाचे पाणी शेतात साचणार नाही याची काळजी घ्यावी.मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता असल्याने खराब हवामान परिस्थितीत जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावीत असा सल्ला जिल्हा कृषी हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ मनीष येदुलवार यांनी दिला आहे.