जिल्हाभर पसरतेय डोळ्यांची साथ नेत्र रुग्णांलयामध्ये गर्दी, काय म्हणतात डॉक्टर वाचा...

 
eyse
बुलडाणा(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): जिल्हाभरात शहरी आणि ग्रामीण भागात सध्या डोळ्यांच्या आजाराची साथ सुरु झाली आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हा संसर्ग पोहचत आहे. डोळ्यात बॅक्टेरिअल इन्फेक्शनचे प्रकार वाढल्याने अनेकांना ही लागण होत आहे. घरातील एकाला इन्फेक्शन झाले की संपूर्ण कुटुंबाला याची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या नेत्र रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांची गर्दी वाढली आहे. 

coupple

सदर साथरोगाबाबत प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. राहुल बाहेकर व सौ. प्रिती बाहेकर यांनी माहिती देताना सांगितले की, डोळे येणे म्हणजे एक प्रकारचा बॅक्टरीया अथवा व्हायरस मुळे होणारा जंतू संसर्ग असून यामध्ये डोळा लाल होणे, छोटा होणे, डोळ्यांना चीपड येणे,  डोळ्याच्या पापण्यांना सुज येणे, डोळ्यातून पाणी येणे, उजेडाकडे बघायला त्रास होणे असे लक्षणे दिसून येत आहेत तर ससंर्ग टाळण्यासाठी वारंवार डोळ्यांना हात लावणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, जाणे आवश्यक असल्यास डोळ्यांवर गॉगल वापरावा, बाहेरुन आल्यावर हात स्वच्छ धुवावे जर घरातील व्यक्तीचे डोळे आले असल्यास त्यांच्यांशी संपर्क टाळावा, डोळे पुसायला रुमाल न वापरता टिश्यू पेपर वापरावे आणि वापर झाल्यावर फेकून द्यावे, डोळा पूर्ण बरा होई पर्यंत घरी आराम करावा व ड्रॉप्स व्यवस्थित टाकावे आणि  लहान मुलांपासून लांब रहावे, असा सल्ला प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रिती राहुल बाहेकर यांनी दिला आहे.

डॉ.राहुल बाहेकर म्हणतात..

कोणत्या प्रकारचा जंतू संसर्ग आहे, त्या नुसार वेगवेगळे डोळ्यांचे ड्रॉप्स लागू शकतात म्हणून डोळ्यांच्या डॉक्टरांच्या सल्याने मशीन वर तपासणी करूनच ड्रॉप्स घ्यावेत. झालेल्या संसर्गाची आक्रमकता बघून उपचाराचा कालावधी वेगवेगळा असू शकतो त्यामुळे मनाने उपचार न करता डॉक्टरांच्या सल्याने उपचार घेतल्यास त्रास लवकर बरा होऊन साथ प्रतिबंध करण्यास उपयोगी ठरेल.