जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळला! चिखलीच्या ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह...कोणतीही लक्षणे नाहीत; पण....

 
Nfnf
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोन वर्षानंतर बुलडाण्यात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलाय. चिखली येथील ग्रामीण रुग्णालयातील ५७ वर्षीय एक्स रे टेक्निशियन पॉझिटिव्ह आढळले आहेत.
 आज,१ जानेवारीला चिखलीच्या ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी रॅपिड आणि आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी रॅपिड तपासणीत एक्स रे टेक्निशियन पॉझिटिव्ह आढळले.वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र असे असले तरी त्यांना गृह विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे चिखलीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल रिंगे यांनी बुलडाणा लाइव्ह शी बोलतांना सांगितले. दरम्यान हा कोरोनाचा नवा जेएन -1 व्हेरियंट आहे का याची तपासणी करण्यासाठी नमुने नागपूरला तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे..