तुम्ही बेरोजगार इंजीनिअर आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी!

शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्रावर तासिका तत्वावर होणार पदभरती! वाचा कशी आहे प्रक्रिया
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा येथील शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र, पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम नववी आणि दहावीकरिता तासिका तत्वावर शिक्षकांची संस्‍था स्तरावर ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे शिकविण्यासाठी पदे सन २०२३-२४ करीता भरण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजीसाठी १ पद असून शैक्षणिक अर्हता डिप्लोमा, बीई इलेक्ट्रीकल आणि एक वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. पूर्व व्यासायिक अभ्यासक्रम मेकॅनिकल टेक्नॉलॉजीसाठी १ पद असून डिप्लोमा, बीई मेकॅनिकल आणि एक वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
अभ्यासक्रम शिकविण्याकरिता अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात घड्याळी तासिका तत्वावर शिकविण्याचे काम देण्यात येणार आहे. वरील पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी सर्व मुळ प्रमाणपत्रासह आणि छायांकित प्रतीसह दि. ३१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वाजता मुख्याध्यापकांच्या दालनात स्व:खर्चाने प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहावे. सदर पदांवरील उमेदवारास शासकीय नियमानुसार मानधन देय राहणार आहे, असे शासकीय तंत्र माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापकांनी कळविले आहे.