'अवकाळी'चा शंभर गावांना फटका! साडेतीन हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त ! वादळी वाऱ्यामुळे ३०९ कुटुंबे बेघर, १३ जनावरांचा मृत्यू...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ९ एप्रिलला झालेल्या वादळी अवकाळी पाऊस व गारपिटीचा जिल्ह्याला जबर तडाखा बसला आहे.बुधवारी संध्याकाळी उशिरा कृषी व महसूल यंत्रणांनी जिल्हा प्रशासनाला नुकसानीचा अहवाल सादर केला. यानुसार ६ तालुक्याना अवकाळीचा फटका बसला आहे.
 प्राथमिक सर्वेक्षण नुसार 'अवकाळी'चा १०२ गावांना फटका बसला असून तब्बल साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. यामुळे मका, भुईमूग, ज्वारी, बाजरी, कांदा, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. याशिवाय फळबागांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने आंब्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. याशिवाय १४ गावांतील ३०९ घरांची आंशिक पडझड झाली आहे. वीज पडून व झाडाखाली दबून १३ जनावरे दगावली आहे. संग्रामपूर तालुक्यातील तिघेजण वीज पडून गंभीर जखमी झाले.राहुल छळकर, विशाल छळकर, मोहन डोंगरे अशी जखमींची नावे असून ते ट्रॅक्टर ने जात होते. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे वातावर आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठे नुकसान झाले तर गेल्या काही दिवसांपासून तापत्या उन्हाच्या झळांनी त्रस्त असल्यामुळे अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.