अहो..आजी आजोबा.. तीर्थदर्शनाला जायचय ना? मग करा की फटाफट अर्ज! मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेसाठी "इथे" करा अर्ज...
Aug 1, 2024, 20:14 IST
बुलडाणा(जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार ६० वर्षांपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांना योजनेत महाराष्ट्रासह भारतातील तिर्थदर्शन होणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील ६० वर्षापुढील नागरीकांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी राज्य शासनाने सर्व जातीधर्मातील नागरिकांसाठी मोफत तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. या योजनेत राज्यातील ६६ आणि भारतातील ७३ पैकी एका स्थळाची दर्शनभेट होणार आहे. या योजनेचा लाभ एका व्यक्तीला एकाच वेळी घेता येणार आहे. अर्ज सादर करताना आधार कार्ड, फोटो, स्वयंम घोषणापत्र, अर्ज, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, हमीपत्र कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.