बुलडाण्यातील "स्पेशल" २३७ भाविक अयोध्येत पोहचले! उत्तर प्रदेश प्रशासनाकडून देखणे स्वागत; उद्या होणार रामलल्लांचे दर्शन

 
अयोध्या(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):बुलडाणा जिल्ह्यातील २३७ भाविक आज,१३ फेब्रुवारीच्या सकाळी ८ वाजता अयोध्येत दाखल झाले. नागपूर येथून ११ फेब्रुवारीच्या रात्री निघालेली स्पेशल आस्था ट्रेन आज सकाळी अयोध्येत पोहचली, या ट्रेन मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २३७ रामभक्त आहेत..
 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या जिल्हा व तालुका पातळीवरील प्रमुख अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. अयोध्येतील तीर्थक्षेत्रपुरम येथे भाविकांच्या निवासाची सोय उत्तर प्रदेश प्रशासनाकडून करण्यात आली आहे. सकाळी अयोध्या रेल्वेस्थानकावर स्पेशल ट्रेन पोहचताच फुलांची उधळण करून प्रशासनाकडून विदर्भातील भाविकांचे स्वागत करण्यात आले. कडेकोट पोलिस बंदोबस्तात भाविकांना निवासस्थानी पोहचवण्यात आले. उद्या, १४ फेब्रुवारीला विदर्भ प्रांतातील भाविकांसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने दर्शनासाठी राखीव वेळ ठेवण्यात आली आहे.