दुचाकीच्या धडकेत युवक जखमी! अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा.. सागवान शिवारातील घटना...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दुचाकीने अजिसपूर येथून बुलढाण्याकडे जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने दुचाकीस्वार युवकाला धडक दिल्याची घटना शुक्रवारी घडली. दरम्यान, युवक जखमी झाला असून अज्ञात दुचाकी चालका विरुध्द सोमवारी शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Advt
        Advt. 👆
निखिल पांडुरंग पवार (२९ वर्ष) असे जखमी युवकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे काका विठ्ठल लक्ष्मण पवार यांनी पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध तक्रार दिली. शुक्रवार, ६ एप्रिल रोजी निखिल हा दुचाकीने अजिसपूर येथून बुलढाण्याच्या दिशेने येत होता. दरम्यान, सागवान शिवारातील सुखदयाल हॉटेल जवळ भरधाव वेगाने येत असलेल्या एका दुचाकीने त्याला मागून धडक दिली. त्यामुळे निखील गंभीर जखमी झाला असून त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्याच्यावर बुलढाणा येथील वाघ हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. निष्काळाजीपणाने वाहन चालविणाऱ्या अज्ञातावर कारवाई व्हावी असे तक्रारीत म्हटले आहे. प्राप्त तक्रारीनुसार शहर पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र हजारे करत आहेत.