बुलडाणा लाइव्ह वर पाहता येणार २० वर्षांची गौरवशाली परंपरा असलेला चिखलीतील युवक काँग्रेसचा दहीहंडी सोहळा! LIVE तुम्ही म्हणाल,याला म्हणतात माहौल.......

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेला व २० वर्षांची गौरवशाली परंपरा असणारा चिखलीतील युवक काँग्रेसचा दहीहंडी सोहळा थोड्याच वेळात सुरू होत आहे. बुलडाणा लाइव्ह च्या यु ट्युब चॅनल वर हा सोहळा याची देही याची डोळा संपूर्ण जिल्हावासियांना लाइव्ह पाहता येणार आहे.
 

 सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहरे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राहुल बोंद्रे संस्थापक अध्यक्ष असलेले श्री छत्रपती शिवराय  क्रीडा प्रतिष्ठान, युवक काँग्रेस व कुणाल बोंद्रे मित्रमंडळाने या सोहळ्याचे आयोजन केले आहे.