आशियाई ऑलम्पिकमध्ये योगाचा समावेश! केंद्रीय आयुषमंत्री ना. प्रतापराव जाधव म्हणाले, हा १४० करोड देशवासियांचा गौरव..

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) २१ जून रोजी जागतिक योग दिन साजरा झाला. याप्रसंगी भारतीय ऑलम्पिक संघाच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांनी केंद्रीय आयुषमंत्री ना. प्रतापराव जाधव यांची भेट घेतली. भेटीदरम्यान, आशियाई खेळांमध्ये योगाचा समावेश झाला पाहिजे अशी इच्छा श्रीमती पी. टी. उषा यांनी व्यक्त केली होती.

याबाबत प्रस्तावही आशियाई परिषदेच्या मंडळाकडे पाठवण्यात आला. ना. जाधव यांनी यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून आशियाई ऑलम्पिक खेळांमध्ये योगाचा समावेश करण्यात आला आहे. 

आशियाई ऑलम्पिक परिषदेची आमसभा सप्टेंबर महिन्यात होणार असून औपचारिक रूपाने योगाचा ऑलम्पिक खेळांमध्ये समावेश होणार आहे. भारतीय प्राचीन योग साधनेला आशियाई ऑलम्पिक खेळांमध्ये स्थान मिळणे म्हणजे हा १४० करोड देशवासीयांचा गौरव आहे. असे बोलून केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी समाधान व्यक्त केले.
ना. जाधव यांनी ऑलम्पिक शेतीचे कार्यकारी अध्यक्ष रणधीरसिंग यांच्याशीही चर्चा केली. योग साधनेतून संपूर्ण विश्वात देशाची वेगळी ओळख निर्माण होणार असून ऑलम्पिक स्पर्धेत योगाला स्थान देणे गरजेचे असल्याचे ना. जाधव म्हणाले होते.