काम बोलता हैं..! अवघ्या दहा वर्षात जिल्ह्यात ५० हजार कोटींची विकासकामे मार्गी! खासदार प्रतापराव जाधव यांच्या कार्यकर्तृत्वाचे फलित; अभ्यासपूर्ण मांडणी करत मिळविला भरघोस निधी
Apr 25, 2024, 16:36 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विकासाचे व्हिजन ठेवून कामे केल्यास त्याचे फलित किती जलदगतीने मिळते, हे खासदार प्रतापराव जाधव यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून सिद्ध केले आहे. सभागृहात मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण मांडणी करत हजारो कोटी रुपयांचा विकास निधी मिळवून घेण्यात खासदार जाधव सरस ठरलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करताना आपली मायभूमी असलेल्या जिल्ह्यातील जनतेला सुख, समृद्धीची अनुभूती देण्याचे कार्य केले. अवघ्या दहा वर्षांच्या कार्यकाळात तब्बल ५० हजार कोटी रुपयांची सार्वजनिक हिताची विकासकामे जिल्ह्यात पूर्ण करून आपल्या कामाची छाप प्रतापराव जाधव यांनी देशभरात पाडली. सोबतच मातृतीर्थ जिल्हा विकासकामात आघाडीवर असल्याचे अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून देण्यात खासदार जाधव अग्रेसर राहिले.
खासदार असावा तर प्रतापराव जाधव यांच्यासारखा, अशा प्रतिक्रिया जिल्हाभर उमटू लागल्या आहेत. सर्वांगीण विकास काय असतो, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या काळात देशवासीयांनी अनुभवले. त्यातच बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा केवळ दहा वर्षांच्या कमी कालावधीत तब्बल ५० हजार कोटी रुपयांची सर्वांगीण विकासाची कामे मंजूर करून काही पूर्ण करण्यात तर काही भविष्यात पूर्ण होण्याच्या वाटेवर असून यामध्ये खासदार प्रतापराव जाधव यशस्वी झाले आहेत. देशात मोदी सरकार येण्यापूर्वी जिल्ह्याचे चित्र भकास होते, जिल्ह्याला मागासलेपणाचा शिक्का लागला होता, जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यापूर्वी जिल्ह्यातील मुलभूत गरजा पूर्ण केल्या पाहिजेत याकरिता खासदार जाधव यांनी शर्थीचे प्रयत्न केले. प्रश्न कोणतेही असो ते अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद मांडण्याचे कसब अंगी असल्याने खासदार प्रतापराव जाधव विकासाचे राजकारण करण्यात इतरांपेक्षा दहा पावले पुढेच राहिले आहेत, हे त्यांच्या विकासकार्याच्या गतीवरून स्पष्ट होते. संसदेत जिल्ह्याच्या प्रश्नाची जी काही मांडणी केली, त्याचेच हे फलित आहे.
मागासलेपणाकडून विकसनशीलतेकडे
आपला विकास आपल्या हाती असल्याने जनतेने विकासाचे राजकारण करणाऱ्यांसोबत राहिले पाहिजे आणि तो चेहरा प्रतापराव जाधव हे आहेत हे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी जाहीर सभांमध्ये सांगितले आहे. मातृतीर्थ जिल्ह्याला लागलेला मागासलेपणाचा शिक्का या दहा वर्षात ५० हजार कोटींची कामे करून पुसण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. जिल्हातील बहुतांशी मुलभूत गरजा पूर्णत्वाकडे असून सोबत औद्योगिकरणासाठी भौतिकसुविधा सुद्धा निर्माण झाल्या आहेत, आता असून पुढील पाच वर्षात पुन्हा मागील दहा वर्षात दिलेल्या निधीच्या पटीच्या तुलनेत विकास कामे पूर्ण केली जातील. त्यासाठी बुलढाण्यातून प्रतापराव जाधव यांना संसदेत पाठविण्याचा निर्धार जनतेने करावा, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.
देशाच्या समृद्धीसाठी केंद्र व राज्यात एकाच विचारधारेची सत्ता गरजेची
विकासाची विचारधारा ज्यांनी अंगीकारत शासन चालविले तेच सत्ताधारी देशात परिवर्तन घडविण्यात यशस्वी होतात याचे अनेक दाखले आहेत. त्यासाठी केंद्र व राज्यात समविचारी पक्षांची सत्ता गरजेची ठरते. जिल्ह्यात देखील खासदार, आमदारही त्याच पक्षांचे असायला हवेत. जसे की खासदार प्रतापराव जाधव यांना राज्यात महायुतीचे सरकार असल्याने राज्याकडून आणि दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील समविचारी एनडीए शासनाकडून हजारो कोटींचा विकास निधी मिळविण्यात कुठलीही अडचण आली नाही. त्यादृष्टीने देश पर्यायाने बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी आणण्यासाठी केंद्र व राज्यात एकाच विचारधारेची सत्ता गरजेची आहे, हे आता जनतेला देखील कळून चुकले आहे.
ही आहेत कामे..
- जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प- १०२८९.१२ कोटी
- जिल्हा रस्ते विकास निधी/कामे- १०६३४.४५ कोटी रुपये
- जिल्ह्यातील रेल्वे विकास - ७०५६.०० कोटी
- •जिल्ह्यातील आरोग्य सुविधा - ४६९५.०६ कोटी
- पाणी पुरवठा योजना (शहरी व ग्रामीण) - ४१८२.२८ कोटी
- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी व ग्रामीण) - ७०५०.९० कोटी
- प्रधानमंत्री व नमो किसान सन्मान योजना – १२५८.२१ कोटी
- नैस्रागिक आपत्ती व पिकविमासाठी केलेले मदतकार्य – १५२४.०० कोटी
- जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास कार्यक्रम- ८६८.०० कोटी
- जिल्ह्यातील महीला सक्षमीकरण -८६४ कोटी
- जिल्ह्यातील विविध विकास कामे - ४२९.६२ कोटी
- पंडित दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजना २९४.९६ कोटी
- मोबाईल टॉवर -११३ कोटी