आ संजय गायकवाड यांच्या प्रयत्नातून बुलडाण्याच्या कारंजा चौकात साकारतोय ताराबाईंचा पुतळा! 'ताराबाईंची भुमी' हिच बुलडाण्याची जागतिक ओळख : आ.बच्चू कडुंचे प्रतिपादन!

 
Bdbdb
बुलडाणा(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): आद्य स्त्रिवादी लेखीका ताराबाई शिंदेंचे गाव म्हणून बुलढाण्याची ओळख जागतिक स्तरावर आहे. त्यांच्या पुतळ्याचे भुमिपूजन माझ्या हातून होणे यापेक्षा मोठे भाग्य काय असू शकते.. बुलढाण्याची माती ही वैचारीक उंचीने भारलेली असल्याचे प्रतिपादन आ.बच्चू कडू यांनी कले. आ.संजय गायकवाड यांच्या प्रयत्नातून कारंजा चौकात आज आद्य स्त्रीवादी लेखिका ताराबाईं सिंदेच्या पुतळ्याचे भुमिपूजन पार पडले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, साहित्यीक सुरेश साबळे, ताराबाई शिंदे स्मारक समितीचे गणेश निकम, कुणाल गायकवाड, प्रा.शाहिणाताई पठाण, पत्रकार राजेंद्र काळे, अरुण जैन, अजय बिल्लारी, नितीन शिरसाट, राम हिंगे, रविकिरण टाकळकर, राम हिंगे, गजेंद्र दांदडे, धनंजय बारोटे, अशोक व्यास, गजानन पडोळ, निनाजी भगत, संतोष म्हस्के, सोमू कायस्थ, अतूल जाधव, तुषार कोठारी, निखील शर्मा, अरविंद होंडे, सचिन तायडे, श्रीकृष्ण शिंदे, आप्पा बोधे, सुनिता जोशी, ताराबाई शिंदे यांच्या परिवारातील सदस्य विद्याताई शिंदे व इतर तसेच कि.वा.वाघ, पंजाबराव गायकवाड, रविंद्र साळवे आदी उपस्थित होते. 
सन १८८२ मध्ये स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिला. स्त्री-पुरुष विषमतेवर प्रहार करणारा ताराबाईंचा ग्रंथ जगप्रसिध्द आहे. स्त्री साहित्याचे अभ्यासक त्याकाळी प्रकाशित झालेल्या ताराबाईंच्या पुस्तकाची आजवर आवर्जून दखल घेत आले आहे. जागतिक पातळीवर ताराबाईंचे नाव पर्यायाने बुलढाण्याचे नाव आहे. बुलढाण्यात त्यांचे स्मारक असावे, अशी मागणी साहित्य संघटनांकडून वारंवार होत होती.
आ.संजय गायकवाडांनी घेतली दखल..
ताराबाई शिंदे बुलढाण्याचे भुषण आहे. आजवर अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले. काहींची नाळ वैचारीक राहिली मात्र ताराबाईंचे स्मारक असावे यासाठी व्हावे तसे प्रयत्न झाले नाही. मात्र आ.संजय गायकवाडांनी हा प्रश्न सोडविला आहे. साहित्य संमेलने होतांना ताराबाईंना अभिवादन करणे, ग्रंथ दिंडी काढण्यासाठी जागा नसायची मात्र हा प्रश्न मार्गी लागला आहे. बुलढाणा शहरात अनेक पुतळे स्मारके उभी राहत आहे. त्यात ताराबाईंचा पुतळा आल्याने वैचारीक उंचीचे वर्तूळही पूर्ण झाले.
 लांजेवार सरांच्या स्मृती जागल्या.
बुलढाण्याच्या साहित्य वर्तुळात स्मृतिशेष भगवान ठग आणि नरेंद्र लांजेवार यांनी राज्यस्तरावर ओळख निर्माण केली होती. बुलढाण्यात ताराबाईंचा पुतळा व्हावा, नाट्यगृह व्हावे यासाठी लांजेवार आग्रही होते. आ.संजय गायकवाड यांच्यापुढे हा मुद्दा प्रथमत: त्यांनी मांडला होता. तो शब्द संजय गायकवाड यांनी आज पूर्ण केला. लांजेवार सर नसल्याने त्यांच्या स्मृतीही जाग्या झाल्या.
दोन महिन्यात काम पूर्ण करु : आ.गायकवाड
ताराबाई शिंदे यांचा पुतळा व्हावा ही मनापासून इच्छा होती. ती लवकरच पूर्ण होत आहे. कारंजा चौकात त्यांचे बालपण गेले तिथेच त्यांचा पुतळा असावा असे वाटत होते. त्यासाठी जागेची अडचण होती ती पूर्ण झाल्याने आज भुमीपूजन झाले. आगामी दोन महिन्यात पुतळा उभा करु असे आ.संजय गायकवाड यावेळी म्हणाले. यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया आ.गायकवाड यांनी झटपट पूर्ण करुन घेतल्या आहे.शिवाय बुलडाण्यातील क्षय आरोग्य धाम ला ताराबाई चे नाव दिले जात आहे.