पुन्हा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल? प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला म्हणाले...

 
ramesg
बुलडाणा(राहुल रिंढे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला आज जिल्ह्यात आहेत.  अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्याचा संघटनात्मक आढावा त्यांनी घेतला. दरम्यान त्याआधी बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी मध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर त्यांनी घणाघाती टीका केली. विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला दोन तृतीयांश बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दरम्यान यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाबाबतही भाष्य केले

Advt

Advt.👆

महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा आतापर्यंत आघाडी सत्तेत होती तेव्हा तेव्हा काँग्रेसचाच मुख्यमंत्री होता, हेच चित्र पुन्हा विधानसभा निवडणुकीत दिसेल का? याबत रमेश चेन्नीथाला यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, सध्या आम्ही मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही. सध्या आम्ही एकत्रित लढण्याच्या मुद्द्यावरच चर्चा करतो आहोत. मुख्यमंत्री पदाबद्दल आणि निवडणुकीनंतर चर्चा करू असे रमेश चेन्नीथाला म्हणाले.