लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीवर कुणाचा झेंडा फडकणार? आज मतदान, आजच लागणार निकाल! खासदार जाधवांची मतदान केंद्रावर भेट

 
लोणार( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होम ग्राउंड म्हणजेच मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीवर विजय मिळवल्यानंतर आज,३० एप्रिलला लोणार कृषी उत्पन्न  बाजार समितीवर झेंडा फडकवण्याचे आव्हान खासदार जाधव यांच्यावर असणार आहे.  मेहकर आणि लोणार कृषी उत्पन्न  बाजार समिती खासदार प्रतापराव जाधव यांचा गड मानल्या जातो. त्यामुळे लोणारच्या बाजार समिती निवडणुकीकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.
 

 एकूण १६७४ मतदार लोणार बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे. सकाळी ११ पर्यंत मतदान केंद्रावर तुरळक मतदारांनी हजेरी लावली. मात्र ११ नंतर मतदार मतदान करण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. आ. रायमुलकर खा. जाधव यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. यंदा पहिल्यांदाच महाविकास आघाडीने तगडे आव्हान खा.जाधवांच्या भूमिपुत्र पॅनल समोर उभे केले आहे. भाजपने देखील स्वबळावर लढण्याचा ४ उमेदवारांना पाठींबा दिलाय त्यामुळे ही निवडणूक देखील चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.