कोण म्हणत खा.प्रतापराव जाधवांनी संसदेत प्रश्न विचारले नाहीत? "हा" घ्या पुरावा! लोकसभेच्या अधिकृत वेबसाईटवर खा. जाधवांनी संसदेत १४७६ प्रश्न विचारल्याची नोंद!

३०० विषयांवर उठवला आवाज! शेतकरी विषयक विषयांना प्राधान्य...
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभेची निवडणूक आता रंगतदार वळणार आली आहे. विद्यमान खा.प्रतापराव जाधव यांनी प्रचारात मुसंडी घेतली आहे. ३ वेळेस दिल्ली गाजवणारा हा योद्धा आता चौकार मारण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान या निवडणुकीत खा.प्रतापराव जाधव यांच्यावर विरोधकांकडून वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत, अर्थात "आपण विद्यमान खासदार असल्यामुळे आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार विरोधकांना लोकशाहीने दिलेला आहे, मात्र विरोधक बिनबुडाचे आणि तथ्यहिन आरोप करीत असल्याचे खा.जाधव सांगत आहेत. खा.जाधव यांनी संसदेत प्रश्नच विचारले नाहीत,त्यांनी जिल्ह्याच्या समस्यांना वाचा फोडली नाही असा एक आरोप विरोधकांकडून करण्यात येतो.तो आरोप तथ्यहीन असल्याचे समोर आले आहे. लोकसभेच्या अधिकृत वेबसाईटवर खा.प्रतापराव जाधव यांनी तब्बल १४७६ प्रश्न विचारल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या राज्यातील ४८ पैकी पहिल्या १० खासदारांमध्ये खा.प्रतापराव जाधव यांचा नंबर लागतो.
Advt
Advt. 👆
  १५ व्या लोकसभेत २००९ ते २०१४ या काळात खा.प्रतापराव जाधव विरोधी पक्षाचा भाग होते. त्यावेळी त्यांनी ५१३ प्रश्न उपस्थित केले. १६ व्या लोकसभेत ४९१ तर १७ व्या लोकसभेत खा.जाधव यांनी ४७२ प्रश्न उपस्थित केले आहेत. २०१४ आणि २०१९ या दोन पंचवार्षिकमध्ये खा.प्रतापराव जाधव यांनी अनेक महत्त्वपूर्ण मुद्दयावर संसदेमध्ये मत व प्रश्न मांडले. पर्यायाने बुलढाणा जिल्ह्याचे दमदार प्रतिनिधीत्व करत केंद्राच्या धोरणात्मक निर्णयामध्ये योगदान दिले. यामुळे राज्यातील ४८ पैकी पहिल्या दहा खासदारांमध्ये त्यांचा समावेश होतो.
सर्वाधिक प्रश्न शेतीवर
             तीन पंचवार्षिकच्या कालावधीत त्यांनी ३०० पेक्षा अधिक विषयांना वाचा फोडुन १४७६ प्रश्न उपस्थित केले. त्यामधील बहुतांश मुद्दे व प्रश्न एक शेतकरी या नात्याने त्यांनी शेती, शेतकरी व कृषी क्षेत्राशी संबंधित विषयावर मांडले. त्याची संख्या सर्वाधिक म्हणजे ९७ आहे. यामध्ये राज्यात व बुलढाणा जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती, नुकसान भरपाई, पीक विमा त्रुटी, जाचक अटी अशा मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. या व्यतिरिक्त कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान, डिजीटलायझेन असे मुद्देही घेत शेतकऱ्यांनी अधुनिक तंत्रज्ञानाची कास धरण्याच्या दृष्टीने देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केले. याशिवाय आरोग्य व कुटूंब कल्याण यावर ७७, वित्त व नियोजन यावर १२४, खते व रसायने १६, माहिती व तंत्रज्ञान ४८, धान्य व सार्वजनिक वितरण प्रणाली ५५, रस्ते वाहतूक आणि महामार्ग ४५, समाज कल्याण व महिला, बालविकास २८, युवक कल्याण व क्रीडा ११, पयर्टन २१, कौशल्य विकास आणि उदयोजकाला १७, टेक्सटाईलवर ३४ असे प्रश्न त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले. तसेच त्याचा पाठपुरावा करून निकाली काढण्यास प्राधान्य दिले. याशिवाय संसदेमधील अभिभाषणाच्या महतत्वपूर्ण प्रसंगी भूमिका मांडण्यासाठी शिवसेनेने प्रामुख्याने प्रतापराव जाधव यांना संधी दिली. ही बुलढाण्यासाठी अभिमानाची बाब ठरावी. तसेच २३ विषयावरील ११८ विशेष चर्चा (डिबेट) मध्ये त्यांनी सहभाग घेतला.
संसदीय समितीमध्ये प्रभावी काम
केंद्राची संसदीय ग्रामविकास, पंचायत राज आणि माहिती तंत्रज्ञान व संवाद विषयक स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. देशभऱात दौरे करून तथा बैठका घेऊन त्यांनी लोकसभेला तब्बल ४९ अहवाल सादर करून एक महत्वपूर्ण भूमिका निभावली. देशाचे ग्रामविकास तथा माहिती तंत्रज्ञान धोरण ठरविण्याच्या दृष्टीने या अहवालांची उपयुक्ततात अनन्य साधारण आहे. खा.प्रतापराव जाधव यांनी पीएम आवास, राष्ट्रीय उपजिविका, मनरेगा, पीएम ग्रामीण सडक, संसद आदर्श ग्राम, ग्रामीण बँकिंक सुविधांचा अभ्यास करूनही २१ अहवाल संसदेत सादर केल आहेत. याशिवाय सायबर सुरक्षा, डेटा संरक्षण याला प्राधान्य देऊन केंद्र सरकारच्या डेटा संरक्षण कायदा व डिजीटल अथर्व्यवस्थेसाठी आधारभूत कायदा तयार करण्यातही प्रतापराव जाधवांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे हे उल्लेखनीय..