Amazon Ad

"ये रिश्ता क्या कहलाता है"? जालिंधर बुधवतांच्या सोशल वॉल वर अजूनही खा. प्रतापराव जाधव अन् धनुष्यबाण; लोकांनी काय अर्थ घ्यायचा?

 
बुलडाणा(राहुल रिंढे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हल्लीच्या राजकारणात कोण कधी अन् कुठल्या पक्षात जाईल याचा नेम नाही. निष्ठा वैगेरे या गोष्टी केवळ भाषणापुरत्या मर्यादित झाल्या आहेत.. बरं ते जाऊद्या...आपण थेट विषयावरच बोलू..पावणेदोन वर्षापूर्वी शिवसेनेत मोठा उठाव झाला..४० आमदार ,१३ खासदार उद्घव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेकडे गेले. या उठावाचे पडसाद संघटनात्मक पातळीवर देखील उमटले. प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेची दोन शकले झाली. बुलडाणा जिल्हादेखील त्याला अपवाद ठरला नाही. खासदार जाधव आणि दोन आमदार यांचा एक गट आणि दुसरा गट उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचा..! जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहिले. या घडामोडी होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. मात्र अद्यापही जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्यावरील "खासदारांचा माणूस" हा शिक्का पुसल्या गेलेला नाही.अर्थात त्याला स्वतः बुधवंत कारणीभूत आहेत. 
 शिवसेनेची दोन शकले झाल्यावर शिंदेंच्या नेतृत्वातील खासदार, आमदारांनी उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो आपापल्या कार्यालयातून काढून टाकले. सोशल मिडीयावरील होम पेज वरील फोटो देखील बदलवण्यात आले. मात्र आश्चर्याची बाब ही की उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या फेसबुक खात्यावरील मुखपृष्ठावर अजूनही धनुष्यबाण आणि खा.प्रतापराव जाधव यांचे फोटो झळकत असल्याने "ये रिश्ता क्या कहलता हैं" अशी चर्चा होणे स्वाभाविक आहे..
   
    लोकांनी काय अर्थ घ्यायचा?
शिवसेना एकसंध होती त्यावेळी जालिंधर बुधवंत आणि खा.प्रतापराव जाधव यांचे अतिशय जवळचे संबंध होते. शिवसेनेतील उठावानंतर देखील बुधवंत यांनी निर्णय घ्यायला बराच वेळ लावला होता. त्यावेळी अशी चर्चा होती की विजयराज शिंदेंची घरवापसी होऊ नये व आपल्याला प्रतिस्पर्धी म्हणून सोयीचा उमेदवार मिळावा म्हणून खा. जाधवांनी आपली दोन माणसे उबाठा कडे ठेवली. यात जर खरचं तथ्य असेल तर हा २० लाख मतदारांच्या भावनेशी खेळ नाही का? लोकांनी काय अर्थ घ्यायचा.....