सदाभाऊंची धडपड कशासाठी? आज जिल्ह्यात येणार ! विशेष आठवणी असलेल्या चिखलीच्या विश्रामगृहावर घेणार रयत क्रांती संघटनेची बैठक..!

 
sk
चिखली(गणेश धुंदळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे माजी कृषि राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटना आणि पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत आज,२० जूनला बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विशेष "स्मरणीय आठवणी" असलेल्या चिखलीच्या विश्रामगृहावर  ते कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.
 

बुलडाणा जिल्ह्याशी सदाभाऊंचे जुने संबंध आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा भाग असताना त्यांनी अनेकदा जिल्ह्याचे दौरे केले आहेत, अनेकदा त्यांचा मुक्कामी प्रवास जिल्ह्यात झाला आहे. चिखलीच्या विश्रामगृहावर देखील त्यांनी अनेकदा पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. सदाभाऊ सध्या भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेवर आमदार असले तरी सध्या ते मंत्रिपदापासून वंचित आहेत. त्यामुळे भाजपवर ते नाराज आहेत. भाजपने आपली दखल घ्यावी यासाठी ते सध्या त्यांच्या रयत क्रांती पक्षाची ताकद वाढवण्यावर  द
भर देत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रयत क्रांती पक्षाला फायदा व्हावा त्यासाठी संघटना बांधणीच्या उद्देशाने त्यांचा आजचा दौरा असल्याचे समजते. दुपारी ३ वाजता ते चिखलीच्या विश्रामगृहावर कार्यकर्त्यांची बैठक घेतील त्यानंतर सायंकाळी ६ ला खामगाव तालुक्यातील अकोली येथे  शेतकरी संवाद बैठकीला ते संबोधित करतील.