आज लोकसभा निवडणुका झाल्या तर....? कसे असेल चित्र? संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर झालेल्या सर्वेचा अहवाल सांगतो अजूनही मोदीच..

 
Gshs
मुंबई(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): लोकसभा निवडणुका आता अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपसह आता विरोधी पक्ष देखील निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. २०१४ मध्ये प्रचंड बहुमत घेऊन नरेंद्र मोदी सत्तेत आले होते त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा मोठ्या बहुमताने सत्तेवर येत त्यांनी विरोधकांना चारीमुंड्या चीत केले होते. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी ९ वर्षांचा कार्यकाळ आता पूर्ण केला आहे. दरम्यान आजघडीला देशात लोकसभा निवडणुका झाल्यास तर काय चित्र असेल याचा एक सर्वे टाइम्स नाऊ व नवभारतच्या वतीने नुकताच करण्यात आला. या सर्वेचा अहवाल आता समोर आला आहे.
 टाइम्स नाऊ ने केलेल्या सर्वेनुसार आजघडीला लोकसभा निवडणुका झाल्या तर पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीला बहुमत प्राप्त होईल. पंतप्रधान म्हणून देखील सर्वाधिक नागरिकांनी आजही नरेंद्र मोदींनाच पसंती असल्याचे हा सर्वे सांगतो. आजघडीला निवडणुका झाल्या तर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीएला २९६ ते ३२६ जागा मिळण्याचा अंदाज आहे तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला १६० ते १९० जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
 लोकसभेच्या सर्वाधिक ७८ जागा असलेल्या उत्तरप्रदेश मध्ये पुन्हा एकदा मोदी - योगीची जादू चालणार आहे. ७८ पैकी ६९ ते ७३ जागा या भाजपच्या आघाडीला मिळण्याचा अंदाज या सर्वेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. १ लाख ६० हजार लोकांनी या सर्वेत सहभाग घेतला.