क्या बात! एकाच दिवशी ४३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले ५६ कोटी; रविकांत तुपकरांच्या आंदोलनामुळे पिकविम्याचा मार्ग मोकळा, ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा

 
fghj
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनाचा इशारा देताच पिकविमा कंपनी वठणीवर आली आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात देखील केली आहे. १३ जून रोजी एकाच दिवसात जिल्ह्यातील ४३ हजार ५८ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. रविकांत तुपकर यांच्यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी तुपकरांवर फोन व मॅसेजेसद्वारे आभाराचा वर्षाव करीत आहेत.
 

१५ जूनपर्यंत शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम न मिळाल्यास १६ जून रोजी हजारो शेतकऱ्यांना घेऊन मुंबईत धडक देऊ आणि एआयसी या विमाकंपनीच्या मुंबईतील बॉम्बे स्टॉक मार्केट मधील २० व्या मजल्यावर असलेल्या कार्यालयातून उड्या मारु, असा गंभीर इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ९ जून रोजी दिला. त्यानंतर अगदी बुलढाण्यापासून मुंबई पर्यंतचे प्रशासन अर्लट झाले. तुपकर इशार देतात तसे वागतात त्यामुळे त्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यापुढे एआयसी पिकविमा कंपनी नरमली आणि या कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातील ५० हजार ७५७ शेतकऱ्यांना ७० कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केली. १५ जून २०२३ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचे लेखी आश्वासनाचे पत्र रविकांत तुपकर यांना १२ जून रोजी दिले. दिलेल्या पत्रानुसार त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करायला सुरूवात देखील केली. मंजूर केलेल्या ७० कोटी रुपयांपैकी ५६ कोटी ७५ लाख रुपये १३ जून रोजी ४३ हजार ५८ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. खात्यात पिकविम्याची रक्कम जमा झाल्याचे मॅसेज शेतकऱ्यांच्या मोबाइलवर धडकले आहेत. उर्वरित रक्कम १५ जून पर्यंत वितरीत केली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचे हे मोठे यश आहे. आर्थिक संकटामुळे पेरणी कशी करावी ? या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या तोंडावर पिकविम्याची रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फोन कॉल आणि आभाराच्या मॅसेजेसचा तुपकरांवर अक्षरश: वर्षाव केला आहे.

रविकांतभाऊ तुमच्या मुळेच

१३ जूनच्या सायंकाळपासून शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पिकविम्याची रक्कम खात्यात जमा झाल्याचे मॅसेजेस धडकू लागले. हजारो शेतकऱ्यांनी त्यांना आलेले मॅसेज जसेच्या तसे रविकांत तुपकरांना पाठवून भाऊ तुमच्या मुळेच हे पैसे मिळाले असे म्हणत आभार मानले.