हेवा वाटावा असा जिल्हा घडवणार, रोजगारनिर्मितीला देणार प्राधान्य! कल्याणा येथील सभेत संदीप शेळकेंचे प्रतिपादन! वन बुलडाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेला उस्फुर्त प्रतिसाद
पुढे बोलतांना ते म्हणाले की, जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक पुसण्यासाठी आपली लढाई आहे. आजही इथल्या तरुणाला पंधरा वीस हजाराच्या नोकरी साठी मुंबई, पुणे यासारख्या ठिकाणी जावं लागत. प्रत्येक तालुक्याचे ठिकाणी एमआयडीसी तयार झाली असती तर इथल्या तरुणांना मोठा रोजगार मिळाला असता. त्यामुळे रोजगारासाठी कायम आपले प्रयत्न राहणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी कायम चिंतेत असताना आपण पाहिलं. मात्र या ठिकाणी संत्रा प्रकिया उद्योग, केळी प्रक्रिया उद्योग शासनाने उभारला असता तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची क्रांती झाली असती. सिंचनाचा मोठा यक्ष प्रश्न आहे, ७६ वर्षाच्या काळापासून जिल्ह्यात सिंचन प्रकल्प प्रलंबित आहे. अशी सगळी कारणे असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी कायम अडचणीत सापडतो. मात्र आता हे सहन केल्या जाणार नाही, सर्वांगीण विकासातून जिल्ह्यात नवी क्रांती घडवून आणण्यासाठी वन बुलढाणा मिशन ही राजकीय चळवळ पुढे आली आहे. जनतेने संधी दिली, तर दिल्ली दरबारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आपण झगडणार आणि शेतकऱ्यांचा विकास करणार अशी भूमिका संदीप शेळके यांनी व्यक्त केली.
बुलढाणा जिल्ह्याला पर्यटन दृष्ट्या विशेष महत्त्व असून सुद्धा पर्यटन विकसित न झाल्याने त्यातून निर्माण होणारा रोजगार खुंटला आहे. जिल्ह्याला गौरवशाली वारसा असला विकासापासून दूर आहे. यामुळे जिल्ह्यासाठी न भूतो..असा विकास साध्य करून देशाला हेवा वाटेल असा बुलढाणा जिल्हा निर्माण करण्यासाठी वन बुलढाणा मिशन निरंतर कार्य करत आहे. जनतेने जर खासदार बनवलं तर आपल्या विकासाची ब्ल्यू प्रिंट प्रत्यक्षात उतरणारच असे ते म्हणाले.