आम्ही "सध्या" तरी सोबत! भाजपच्या भूपेंद्र यादवांनी शिवसेनेसोबतच्या युतीवर सांगून टाकल..! म्हणाले महाराष्ट्रातील ४८ जागांवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढू; कर्नाटकच्या पराभवावर म्हणाले....

 
fghjkl
बुलडाणा( राहुल रिंढे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय मंत्री तथा भाजपच्या मिशन लोकसभा अंतर्गत बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सांभाळत असलेले भूपेंद्र यादव आज,९ जून रोजी तिसऱ्यांदा बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दिवसभरात मेहकर, देऊळगावराजा, चिखली येथील कार्यक्रम आटोपून संध्याकाळी त्यांनी बुलडाण्यात जाहीर सभेला संबोधित केले. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्रातील मोदी सरकारच्या ९ वर्षातील उपलब्धी त्यांनी सांगितल्या. देश आता नव्या उंचीवर जात आहे, कोविड काळात भारताने जगाला आदर्श दिला याशिवाय घर, पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि शेतकरी हितांच्या योजना केंद्र सरकारने राबविल्या असल्याचे ते म्हणाले. दरम्यान पुढील लोकसभा  निवडणुका एकनाथ शिंदेच्या युतीसोबत लढणार की स्वबळावर या प्रश्नावर आम्ही सध्या तरी सोबत आहोत, महाराष्ट्रातील ४८ जागांवर हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आम्ही लढू असे ते म्हणाले.
 

 जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर, आमदार संजय कुटे, आमदार श्वेताताई महाले, माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यासह जिल्हा भाजपचे सर्वच वरिष्ठ पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.केंद्रातील सरकार सबका साथ सबका विकास या मुद्द्यावर चालणारे आहे. काँग्रेस सरकारच्या काळात दिव्यांगासाठी ७ कॅटेगिरी होत्या त्या केंद्र सरकारने २१ केल्या, २०१४ पर्यंत देशात ७४ विमानतळे होती आता त्यात ७४ नव्या विमानतळाची भर पडली. देशात ७०१ नवे मेडिकल कॉलेज बनवण्यात आलेत. जगातल्या ५ मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. मोबाईल निर्मिती क्षेत्रात भारत १२ व्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर आला आहे,५०० वर्षांपासून प्रलंबित असणारा रामजन्मभूमीचा मुद्दा सुद्धा आता निकाली निघाल्याचे भूपेंद्र यादव यावेळी म्हणाले.