खा.प्रतापराव जाधवांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत! ह.भ. प प्रकाशबुवा जवंजाळ यांचे प्रतिपादन; आ. श्वेताताईंच्या मार्गदर्शनात चिखली विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार दौरा
Apr 12, 2024, 17:41 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संपूर्ण विश्वात सध्या भारताचे नाव गौरवाने घेतल्या जाते. संपूर्ण विश्व पटलावर भारताचा जयजयकार होत आहे. आता जगाला भारताचा हेवा वाटतो आहे. भारताला विश्वगुरूच्या स्वर्णिम सिंहासनावर आरूढ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी खा.प्रतापराव जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. प्रतापराव जाधव यांना मत म्हणजे मोदींना मत असल्याचे प्रतिपादन भाजपा नेते ह.भ. प प्रकाशबुवा जवंजाळ यांनी केले. चिखली विधानसभा मतदारसंघातील हरणी, वैरागड, तोरणवाडा, धोत्रा नाईक, वैरागड, किन्ही नाईक, तोरणवाडा, मोहदरी, असोला नाईक, करवंड या गावांत आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनात खा.प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आज आयोजित कॉर्नर बैठकांत ते बोलत होते.
यावेळी बोलतांना प्रकाश महाराज जवंजाळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची वाटचाल विश्वगुरूच्या दिशेने होत आहे. शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणसांच्या हिताचे सरकार म्हणजे काय असते हे केंद्र सरकारने दाखवुन दिले आहे. रामराज्याच्या संकल्पनेवर महायुतीचा विश्वास आहे. प्रभू श्रीरामचंद्राचा वनवास आता संपला आहे. काश्मीरमधील ३७० कलम रद्द झाल्याने दहशतवादाचा समूळ नायनाट होण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात बुलढाणा लोकसभा मतदारसंघात खा.प्रतापराव जाधव यांनी हजारो कोटींची कामे केली आहेत. मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग, सिंचनाच्या सोयी, शेगाव रेल्वेस्टेशन व खामगाव जालना रेल्वेमार्ग संदर्भात खा.जाधव यांचे भरीव योगदान असल्याचे गौरवोद्गार प्रकाशबुवा जवंजाळ यांनी काढले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख गजानन मोरे, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी बापू देशमुख, सुनील वायाळ, विशाल इंगळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.