मतदारांचा नरेंद्र मोदींकडे कल ...देशहिताचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवुन मतदार पोहचत आहेत मतदान केंद्रावर... मतदानात दिसत आहे प्रतापरावांची हवा ...

 
Bbsb
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देव, देश आणि धर्म रक्षणाची जबाबदारी उचलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा केंद्रातील सत्तेत विराजमान करण्याची मानसिकता मतदारांमध्ये दिसत असल्याने मतदार संघात चित्र बदल्याचे दिसत आहे. त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदार संघात प्रतापराव जाधव यांची हवा असल्याचे चित्र मतदानावरून दिसुन येत आहे . राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवूनच मतदारराजा मतदान केंद्रावर पोहचत असल्याचे आहे. १० वर्षाआधीचे काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआ सरकार आणि अलीकडच्या १० वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार याचे सुस्पष्ट आकलन मतदारराजाने केल्याने ४ जूनचा निकाल प्रतापराव जाधव यांच्या बाजुने येण्याची शक्यता आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघापूरते बोलायचे झाल्यास इथे ३ वेळा निर्विवाद वर्चस्व ठेवणाऱ्या प्रतापराव जाधवांचा विजयाचा मार्ग सुकर आणि मोकळा झाल्याचे दिसत आहे .
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात खासदार प्रतापराव जाधव सलग तीन वेळा चढत्या आणि विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. अलीकडच्या १० वर्षात खासदार जाधव सत्ताधारी पक्षाचा भाग असल्याने गत ५० वर्षात झाली नाहीत तेवढे विकास कामे खासदार जाधव यांनी केली आहेत. हजारो कोटी रुपयांचा निधी मतदार संघात आणला आहे. नरेंद्र मोदींचा सरकार येणार असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी मतदार हा प्रतापराव जाधव बाजून उभा असल्याचे दिसुन येत आहे 
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत , जे विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. सर्वच आमदार खासदार जाधव यांच्या विजयासाठी झटत आहेत, आज मतदानाच्या दिवशी देखील सर्वच आमदार आपापल्या मतदारसंघातील आढावा घेत असून सगळीकडेच खा.जाधव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहेत. देशहित, राष्ट्रहित सर्वतोपरी मानून मतदारराजा खा.जाधव यांना चौथ्यांदा दिल्लीत जाण्यासाठी आशीर्वाद देत असल्याचे चित्र आहे..अर्थात याची अधिकृत घोषणा ४ जूनला होणार आहे.