देशाच्या सुरक्षेसाठी प्रतापराव जाधवांनाच मतदान करा ! आमदार श्वेताताई महाले यांचे आवाहन; सातगाव म्हसला, डोमरूळ, धामणगाव, मासरूळमध्ये प्रचार दौऱ्याला दमदार प्रतिसाद;

म्हणाल्या, आपल्यासाठी प्रतापराव हेच मोदी...
 
चिखली
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. संपूर्ण जगामध्ये देशाचा सन्मान वाढवणारे पंतप्रधान मोदी हवेत की आपल्या देशाच्या दुसऱ्या देशात जाऊन अपमान करणारे विरोधक हवेत हे ठरवणारी ही निवडणूक आहे. देव देश आणि धर्माच्या सुरक्षेसाठी मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचा संकल्प आता देशाच्या जनतेने केला आहे,त्यामुळे प्रतापरावांना मत म्हणजे मोदींना मत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी, देशाच्या सन्मानासाठी, गौरवासाठी, रोजगारासाठी, शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रतापरावांना प्रचंड बहुमताने विजयी करा, आमच्यासाठी प्रतापराव जाधव हेच मोदी आहेत असे समजून मतदान करा असे आवाहन चिखली विधानसभेच्या आमदार श्वेताताई महाले यांनी केले. खा.प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी आ. श्वेताताईंनी सातगाव म्हसला, डोमरुळ, धामणगाव व मासरुळ भागात प्रचार दौरा केला. यावेळी जनतेशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या.
Advt
Advt.👆
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारताचा संकल्प केलेला आहे. राष्ट्रहिताची एवढी तळमळ असलेला नेता विरोधी पक्षात आहे का? असा सवाल यावेळी त्यांनी केला. खा.प्रतापराव जाधव यांनी मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची कामे केले आहेत. संसदीय कार्यप्रणालीचा एवढा अनुभव असलेला त्यांच्यासारखा नेता आजघडीला जिल्ह्यात नाही.त्यामुळे विरोधकांच्या घोषणांनी हुरळून न जाता आपल्यासाठी आपले प्रतापराव जाधव हेच आपले मोदी आहेत हे ध्यानात ठेवा असेही आ. श्वेताताई म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अबकी बार ४०० पारचा नारा दिला आहे. त्या ४०० मध्ये खासदार प्रतापराव जाधव हे राहणारच आहे, ४०० पार मध्ये आपला खारीचा वाटा असला पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.