मनसे च्या स्वबळाच्या घोषणेनंतर खामगाव मतदार संघात विठ्ठल लोखंडकार, शिवा लगर ठरू शकतात मनसे'चे विधानसभेचे उमेदवार!

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या पदाधिकारी मेळाव्यात स्वबळावर लढण्याची घोषणा दिली आहे.या घोषणेनंतर खामगाव विधानसभा मतदार संघात मनसे चे उमेदवार म्हणून विठ्ठल लोखंडकार, शिवा लगर यांचे नावे चर्चेत येत आहेत.
Dada
Advt👆
युती कोणासोबत करावी? हे नंतर ठरवू मात्र यावर्षी मनसे सत्तेत बसली पाहिजे यासाठी आपल्याला २२५ ते २५० जागा लढवायच्या आहेत.असेही राज ठाकरे यांनी सांगितलं.
मनसे ची भूमिका आ.फुंडकर यांची चिंता वाढवणार?
राज्यात मनसे चा प्रभाव असणाऱ्या जागांपैकी खामगाव विधानसभा मतदार संघ आहे. याच मतदार संघात मनसे चे प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार हे स्थानिक आहेत.यासह मनसे कामगार संघटना, घंटा गाडी संघटना'च्या माध्यमातून मनसे ने मागील काही वर्षांपासून आपला चांगला प्रभाव या मतदार संघात निर्माण केला आहे.विठ्ठल लोखंडकार हे कुणबी समाजातून येतात. कुणबी समाजाचे प्रेम नेहमीच कुणबी समाजाचे जेष्ठ म्हणून बाबुराव सेठ लोखंडकार यांच्यावर राहिले आहे.याचा फायदा विठ्ठल लोखंडकार यांना होवू शकतो.यासह यास युवा उद्योजक शिवा लगर हे सुद्धा कुणबी समाजातील असल्यामुळे त्यांची समाजावर बऱ्यापैकी पकड आहे. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत व सक्षम आहे. जर मनसे कडून त्यांनाही उमेदवारी जाहीर झाली तर त्याचा कितपत फायदा मनसे ला होईल हे येणारा काळच सांगू शकेल.