खा.प्रतापराव जाधवांकडून ४ उमेदवारी अर्ज दाखल
Updated: Apr 2, 2024, 22:58 IST
महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव गणपतराव जाधव यांनी जंगी शक्ती प्रदर्शन करतेवेळी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. खा.जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल करते वरील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात एकूण १२ जण उपस्थित असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. एक उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी केवळ ५ जण उपस्थित राहण्याचा नियम असताना एवढी उपस्थिती कशी असा प्रश्न विचारल्या जात होता, मात्र आता त्यावर स्पष्टीकरण समोर आले आहे.
खा.प्रतापराव जाधव यांनी एकूण ४ उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे एका अर्जासोबत खा.जाधव यांच्यासह ५ असे ४ अर्ज दाखल करतेवेळी वेगवेगळे नेते उपस्थित होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमाचे तंतोतंत पालन करूनच अर्ज भरण्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
खा.जाधव यांचा अर्ज भरतेवेळी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय कुटे, आमदार श्वेताताई महाले, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार संजय गायकवाड, आमदार संजय रायमुलकर, आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे , माजी आमदार चैनसुख संचेती, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी उपस्थित होते.