नरेंद्र खेडेकरांच्या विजयी प्लॅनिंगसाठी वंजारी समाजाची बैठक हाऊसफुल्ल! जालिंधर बुधवंत म्हणाले, समाज निष्ठावान माणसाची कदर करणारा; प्रा.खेडेकर म्हणाले,

वंजारी समाजाचे उपकार विसरणार नाही, मुंडे साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करीन...

 
Ghgg
देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २६ एप्रिलला बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. काल,२४ एप्रिलच्या सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जोरदार आघाडी घेतली. छोट्या छोट्या मात्र तेवढ्याच परिणामकारक ठरणाऱ्या  बैठकांमुळे खेडेकरांची ताकद चांगलीच वाढली. काल, २४ एप्रिलच्या दुपारी असोला फाट्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली झालेली वंजारी समाजाची बैठक सुपरहिट आणि खेडेकरांना जोरदार ताकद देणारी ठरली. वंजारी समाजातील अनेक प्रतिष्ठित आणि नेतृत्वक्षमता असणारी प्रमुख  मंडळी या बैठकीला होती. या बैठकीत एकमताने महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांनी वंजारी समाज हा निष्ठावान माणसाची कदर करणारा समाज आहे, गद्दारी करणाऱ्यांना समाज थारा देत नाही, स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांचीच ही शिकवण असल्याचे प्रतिपादन केले. या बैठकीला महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा.नरेंद्र खेडेकर यांचीदेखील उपस्थिती होती.

   लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांनी शून्यातून विश्व उभारले. साहेबांचे समाजासाठी खूप मोठे योगदान आहे. प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या मुंडे साहेबांना समाजाने साथ दिली आणि मुंडे साहेबांनी आपल्या कार्यकर्तुत्वाने समाजाचे ऋण फेडले. मुंडे साहेब माझ्यासाठी आयडॉल आहेत, दैवत आहेत असे प्रतिपादन प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी केले. यावेळी मुंडे साहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना प्रा.खेडेकर भावूक झाले होते. वंजारी समाजाने पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याबद्दल खेडेकर यांनी आभार मानले. तुमच्या आशीर्वादाने आपला विजय होणारच आहे, समाजासाठी मला अर्ध्या रात्री फोन करा, नरेंद्र खेडकर तुमच्यासाठी सदैव हजर आहे, मुंडे साहेबांच्या विचारांवर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संसदेत काम करीन, वंजारी समाजाचे उपकार मी कधीही विसरणार नाही असेही  प्रा. खेडकर यावेळी म्हणाले.