बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या रणधुमाळीत वंचितची एन्ट्री! विधानसभेत तीनदा पडलेल्या वसंतराव मगर यांना उमेदवारी; ३ निवडणुका ३ पक्षाकडून लढल्या! आता चौथ्यांदा वंचितकडून...

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उबाठा शिवसेनेने बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची नरेंद्र खेडेकर यांना जाहीर केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने देखील बुलडाणा लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. वंचित ने वसंतराव राजाराम मगर यांना उमेदवारी दिली आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेतून विधानसभा निवडणुकीत तीनवेळा पराभव पचवलेल्या मगर यांची उमेदवारी घोषित केली.
 वसंतराव मगर यांनी १९९० ला शिवसेनेकडून सिंदखेडराजा विधानसभा निवडणुकीची लढली. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार तोताराम कायंदे निवडणूक आले होते.मगर यांना जेमतेम १८८३४ मते मिळाली होती. १९९५ च्या निवडणुकीत मगर यांनी भारिप बहुजन महासंघाकडून सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढली तेव्हा १९०८६ मते मिळवून ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. २०१४ ला त्यांनी पुन्हा मायावतींच्या बहुजन समाज पार्टीकडून निवडणूक लढली, यावेळी त्यांना केवळ ७ १३१ मते मिळाली होती. आता विधानसभा सोडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले आहेत वंचित बहुजन आघाडीकडून...