वन बुलढाणा मिशनच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलढाणा मिशनच्या जिल्ह्यातील सर्व संपर्क कार्यालयात १७ नोव्हेंबर रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. 
राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांच्या हस्ते बुलढाणा संपर्क कार्यालयात बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पृथ्वीराज राजपूत, रामू राजपूत, विठ्ठल येवले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. चिखली, खामगाव, शेगाव, लोणार, मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, जळगाव जामोद, संग्रामपूर, मोताळा येथील कार्यालयात सुद्धा अभिवादन करुन शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.