वन बुलडाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेने मोताळा, शेगाव तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले! गावागावात गुंजला विकासासाठी परिवर्तनाचा नारा; लोक म्हणाले"आतापर्यंत लई पाह्यले पण..."

 
शेगाव

शेगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजकारणाला व्यवसाय किंवा पैसे कमावण्याचे साधन न समजता "मिशन" समजून ते राबवण्याचा प्रयत्न केला की जनता तुम्हाला डोक्यावर घेते..होय...याचा प्रत्यय आता समस्त बुलडाणा जिल्हावासियांना येतोय तो वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांच्या रूपाने..कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही की राजकीय पक्षाची ताकद नाही..मात्र जिल्ह्याच्या विकासाच्या ध्येयाने झपाटलेल्या संदीप शेळके यांना जो पाठींबा आणि प्रचंड जनसमर्थन मिळतेय ते प्रस्थापित राजकारण्यांच्या झोपा उडवणारे ठरत आहे..१० फेब्रुवारीपासून मोताळा तालुक्यातील नळकुंड येथून त्यांनी सुरू केलेल्या परिवर्तन रथयात्रेने आता मोताळा आणि शेगाव या दोन तालुक्यांचा प्रवास पूर्ण केलाय. उद्या, २२ फेब्रुवारीपासून ही यात्रा संग्रामपूर तालुक्यात दाखल होणार आहे. बुलडाणा लोकसभा क्षेत्रातील एकूण ११ तालुक्यांत ही यात्रा पोहचणार आहे.गावागावात जाऊन संदीप शेळके विकासाच्या मुद्द्यांना हात घालत आहेत, गावातल्या शेतकरी, शेतमजूरांच्या प्रश्नांवर, तरुणांच्या शिक्षणाच्या,रोजगाराच्या मुद्द्यावर संवाद साधत आहेत..त्यामुळे आतापर्यंत आम्ही लै राजकारणी पाह्यले पण विकासाचा दृष्टिकोन घेऊन चालणारा संदीप शेळकेंसारखा नेता आम्ही नाही पाह्यला अशा प्रतिक्रिया मोताळा आणि शेगाव तालुक्यातील गावखेड्यात ऐकायला मिळत आहेत..

मोताळा तालुक्यातील नळकुंड येथून १० फेब्रुवारी पासून वन बुलडाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेला सुरुवात झाली. तीन दिवस संपूर्ण मोताळा तालुक्यात परिवर्तन रथयात्रेचा जागर बघायला मिळाला. गावागावांत या यात्रेला भरभरुन प्रतिसाद मिळाला. १३ फेब्रुवारीच्या सायंकाळी परिवर्तन रथयात्रेने मोताळा तालुक्याचा निरोप घेतला.त्यानंतर १५ फेब्रुवारीपासून परिवर्तन रथयात्रेने संतनगरी शेगाव शहरासह संपूर्ण तालुका पायाखाली घातला. जिल्ह्याच्या विकासाची तळमळ, व्हिजन व आक्रमकतेचे दर्शन घडवत संदीप शेळके यांनी जनतेला साद घातली. या युवा नेत्याचे गावोगावी जल्लोषात स्वागत झाले. कोणत्याच राजकीय नेत्याने आजपर्यंत मांडल्या नाही अशा संकल्पना संदीप शेळके मांडत असल्याने जनतेतून त्यांना भक्कम पाठींबा आणि आशीर्वाद मिळत आहेत.  
मुद्द्याच राजकारण...
संदीप शेळके नेंमक बोलतात, मुद्द्याच बोलतात..सामान्यांच्या प्रश्नांवर बोलतात, त्यांच्या भाषणात फाफटपसारा रहात नाही..जिल्ह्याचा विकास नेमका कसा करायचा याची ब्लू प्रिंट त्यांच्याजवळ तयार आहे, आपल्या भाषणातून विकासाच नेमक व्हिजन ते लोकांसमोर मांडतात..हल्ली जिल्ह्याच्या राजकारणात ज्या मुद्द्यांना कुणी हात घालत नाही तेच मुद्दे नेमके संदीप शेळके यांनी हेरले आहेत..याचा व्हायचा तोच परिणाम होतोय .आता गावोगावी वन बुलडाणा मिशनचा विकासाचा आणि परिवर्तनाचा नारा गाजत आहे..
आता "मिशन" संग्रामपूरात...
येत्या २२ फेब्रुवारीपासून संदीप शेळके परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून संग्रामपूर तालुक्यात आहेत. चार दिवसांत ते तब्बल ७० गावात जाणार आहेत. संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी सर्वात आधी संदीप शेळके पूरग्रस्त गावात पोहचले होते. त्यांनी पूरग्रस्तांना आवश्यक मदत व साहित्य वाटप केले होते. वन बुलढाणा मिशनच्या स्वयंसेवकांनी तत्काळ मदतकार्य सुरु केले होते. आता परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून संदिप शेळके संग्रामपूरवासीयांशी संवाद साधणार आहेत. 
 पहिल्या दिवशी या गावांत होणार परिवर्तनाचा जागर..
परिवर्तन रथयात्रा २२, २३, २४, २५ फेब्रुवारी असे चार दिवस संग्रामपूर तालुक्यात परिवर्तनाचा जागर करणार आहे. या भागातील विविध समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. पहिल्या दिवशी म्हणजे २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता राजपूर येथून परिवर्तन रथयात्रेस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर अकोली, चांगेफळ बु. चांगेफळ खुर्द, निवाना, निरोड, धामणगाव, मारोड, करमोडा, लाडनापूर, टूनकी, वसाली, सोनाळा, पलसोडा आणि बावनबीर येथे सभा होणार आहेत. संदीप शेळके विकासाचे व्हीजन जनतेसमोर मांडणार आहेत...