संग्रामपूर तालुक्यात वन बुलडाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेला उदंड प्रतिसाद! सोनाळा,निरोड, टुनकी , सगोडाच्या सभा गाजल्या; संदीप शेळके म्हणाले, आता जिल्ह्याने परिवर्तनाचा निर्धार केलाय...

 
खूप
बुलडाणा(बुलढाणा लाइव वृत्तसेवा):- वन बुलढाणा मिशनची परिवर्तन रथ यात्रा संग्रामपूर तालुक्यात सुरू आहे. विकासाचे व्हिजन घेऊन निघालेल्या संदीप शेळके यांना गावोगावी भक्कम प्रतिसाद मिळतोय. ठीकठिकाणचे प्रेम पाहून भारावून गेलो असल्याची भावना संदीप शेळके यांनी भाषणातून व्यक्त केली. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा,निरोड, टुनकी, सगोडाच्या सभा गाजवत यात्रा पुढे निघाली. आज संग्रामपूर तालुक्यात यात्रेचा दुसरा दिवस आहे. तामगाव, बोडखा, काकोडा ,चोंडी या गावातून पुढे निघत संग्रामपुरात आजचा मुक्काम होणार आहे.
डंकन
सोनाळा,नीरोड टूनकी, सगोडा येथील सभेत संदीप शेळके यांनी होणाऱ्या विकासकामांचा पाढा वाचला.. ते म्हणाले, तुम्ही फक्त साथ द्या, गाव खेड्याचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द त्यांनी दिला. अजूनही जिल्ह्यातल्या गावागावातील गावकरी शेकडो सुविधांपासून वंचित असल्याचे ते म्हणाले. स्वच्छतागृह नसल्याने माय माऊल्यांना मोठी समस्या निर्माण होते. मात्र लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष दिले नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. तरुण, तरुणींना सैन्यभरतीचा सराव करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य, अगदी मैदानापासून तर छोट्या क्रीडा साहित्यांपर्यंत आवश्यक त्या सर्व बाबी उपलब्ध करून देण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करणार आहोत असेही संदीप शेळके म्हणाले.
  
   गाव खेड्यातील स्त्रियांना आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी बचत गटाची व्याप्ती वाढवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. किरकोळ आजार असला तरी गावातील ग्रामस्थांना, महिलांना, चिमुकल्यांना शहरात आणावे लागते, आवश्यक सुविधापुरक आरोग्य केंद्र असले तर या समस्या सुटू शकतात असे संदीप शेळके म्हणाले.
  पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागते, जर पांदन रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे झाले तर ती कसरत टाळली जाईल, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पोषण आहारापासून ते वर्ग खोल्यापर्यंत लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. कारण विद्यार्थी उद्याचे भविष्य आहेत असे संदीप शेळके म्हणाले.
बुलडाणा
संग्रामपूर तालुक्यात गावागावात शेकडो समस्या आहेत मात्र सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्षित केल्याचा आरोप शेळकेंनी यावेळी केला. गावागावात संदीप शेळकेंच्या सभेला अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. मुद्द्याचे राजकारण करून विकासाचे व्हिजन सामान्य जनतेपुढे मांडत असल्यामुळे त्यांना गाव खेड्यातील जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
आज "या" गावांत होतोय परिवर्तनाचा जागर !
दुपारपर्यंत कवठळ ,कुंभारखेड, हिंगणा ,वरवट खंडेराव, या गावात पोहोचली. पुढे पातुर्डा बु, पातुर्डा खु, टाकळी पंच, कुंद्रेगाव, कोंद्री ,उकळी, या दिशेने यात्रा निघाली आहे. रात्री आवार, वानखेड, दुर्गादैत्य या गावात यात्रा पोहोचणार असून संग्रामपूरात यात्रेचा मुक्काम होणार आहे. वरील सर्व गावात वन बुलढाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा पोहोचून परिवर्तनाचा जागर करत आहेत.