वन बुलडाणा मिशनची अर्ज आशीर्वाद यात्रा ठरली लक्षवेधी.!संदीप शेळकेंच्या उमेदवारी अर्जाचे गावोगावी पुजन; सर्वधर्मीय प्रार्थना स्थळी झाला विकासाचा गजर;

आज जनसमुदायाच्या साक्षीने दाखल करणार उमेदवारी अर्ज...

 
Vhgg
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलडाणा मिशनची अर्ज आशीर्वाद यात्रा लक्ष वेधून घेणारी ठरली. गेल्या २ दिवसांत संदीप शेळके यांच्या उमेदवारी अर्जाच्या प्रती जिल्ह्यातल्या तब्बल ५०० पेक्षा अधिक गावांत पोहचल्या,त्या त्या गावांतील मंदिरात, बुद्ध विहारात, मस्जिद मध्ये तसेच सर्व धर्मीय प्रार्थना स्थळी अर्ज पोहचून अर्जाला आशीर्वाद घेण्यात आले. एकंदरीत ही संकल्पना अभिनव आणि हिट ठरली आणि अर्ज आशीर्वाद यात्रा राजकीय चर्चेचा विषय ठरली..आज,३ एप्रिलच्या मुहूर्तावर वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तत्पूर्वी जाहीर सभेला संदीप शेळके संबोधित करणार आहेत.
  Vhhh
१ एप्रिल रोजी राजश्री शाहू मल्टीस्टेटच्या अध्यक्षा सौ. मालती शेळके यांनी बुलडाणा तालुक्यातील कोलवड येथील शिवमंदिरात अभिषेक व पूजा केली. काल २ एप्रिल रोजी संदीप शेळके यांनी मूळ गावी शिरपूर येथे जाऊन गावकऱ्यांचे आशीर्वाद घेतले, सपत्नीक पूजा - अर्चा केली. जिल्ह्यातील संत नगरी शेगाव, गारडगाव येथील बुद्ध विहार, मातृतीर्थ सिंदखेडराजा, चिखली येथील रेणुका माता मंदिर, अमडापूर येथील बल्लाळदेवी संस्थान लासुरा, शेगाव शहर, बोरी आडगाव, खामगाव शहर, लोणार, गायखेड, इसोली, जळगाव जामोद, इलोरा, वडशिंगी, पळशी सुपो, धानोरा, काकणवाडा, वानखेड, देऊळगाव मही, बायगाव, गाडेगाव, सोनेवाडी, पिंपळवाडी डोंगरशेवली, डोंगरखंडाळा, दत्तपूर,तांदुळवाडी, रायपूर हातनी, येळगाव यासह विविध गावांत संदीप शेळके यांच्या उमेदवारी अर्जाचे पूजन घेत अर्जाला देवीदेवतांचे , महापुरुषांचे, थोरामोठांचे आशीर्वाद घेण्यात आले.
 आज जंगी शक्ती प्रदर्शन...
आज ३ एप्रिलला संदीप शेळके उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जिजामाता प्रेक्षागार मैदानाजवळ असलेल्या टिळक क्रीडा नाट्य मंडळाच्या मैदानात संदीप शेळके जाहीर सभेला संबोधित करतील. त्यानंतर संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार गल्ली सोनार गल्ली, कारंजा चौक, एडेड चौक येथे भव्य रॅलीचा समारोप होईल, त्यानंतर संदीप शेळके आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.