वन बुलडाणा मिशनच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त विविध ठिकाणी फराळ वाटप!

 
Jcnfn
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलडाणा मिशनच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी फराळ वाटप करण्यात आले. वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांच्या सुचनेनुसार ४० पेक्षा अधिक ठिकाणी फराळ वाटप करण्यात आले.
 राजश्री शाहूमल्टीस्टेट च्या अध्यक्षा सौ. मालती शेळके यांच्या हस्ते विविध ठिकाणी फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला. डोंगरशेवली, साकेगाव, राजुर, भोरटेक, शेंबा, दाताळा, रोहिणखेड, पातुर्डा, संग्रामपूर, मैलपेंड, जळगाव जामोद, येरळी, काकनवाडा, धामणगाव बढे, लिहा, खामगाव, मेरा, देऊळगावमही, जानेफळ, उटी, अंजनी, मांडवा यासह विविध ठिकाणी कार्यक्रम पार पडले.