UPDATE पोलिसांच्या डोक्यात काय? तुपकरांना घेऊन पोलीस मेहकरकडे..! चिखलीत कार्यकर्त्यांनी अडवले पण.....
पोलिसांनी तुपकर यांना अटक केल्यानंतर आधी बुलडाणा पोलीस ठाण्यात नेले त्यानंतर वैद्यकीय तपासणी साठी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांना आज रात्रभर बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात ठेवण्यात येऊन उद्या न्यायालयासमोर हजर करण्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र तुपकर यांना घेऊन पोलीस मेहकर कडे निघाले आहेत. त्यामुळे अचानक असे एकाएकी काय झाले? तुपकर यांना मेहकरला कशासाठी आणि का नेण्यात येत आहे याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही..
चिखलीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ताफा अडवला...
दरम्यान आत्ता हाती आलेल्या वृत्तानुसार चिखली येथील खामगाव चौफुली वर तुपकर यांना घेऊन जाणारा ताफा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून तुपकर यांना घेऊन पोलीस मेहकरच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यापाठोपाठ स्वाभिमानीचे कार्यकर्त्यांच्या काही गाड्या देखील मेहकरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत..