UPDATE एल्गार रथयात्रा किन्होळा गावात पोहचली;आज शेवटचा मुक्काम! उद्या बळीराजाची फौज बुलडाणा शहरात धडकणार...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी शेतमजुरांसाठी काढलेली एल्गार रथयात्रा आज, १९ नोव्हेंबरच्या रात्री १० वाजता किन्होळा गावात पोहचली. एल्गार रथयात्रेचा आज किन्होळा गावात शेवटचा मुक्काम आहे. उद्या, २० नोव्हेंबरला सकाळी ही रथयात्रा केळवद, येळगाव मार्गे बुलडाणा शहरात दाखल होणार आहे. तिथे एल्गार रथयात्रेचे एल्गार महामोर्चात रूपांतर होऊन हा मोर्चा जिजामाता प्रेक्षागार मैदानातून जयस्तंभ चौक, बाजार गल्ली, कारंजा चौक मार्गे बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
रविकांत तुपकर उद्या या महामोर्चाला संबोधित करणार आहेत. या महामोर्चात केवळ बुलडाणा जिल्हाच नव्हे तर सोयाबीन कापूस उत्पादक पट्ट्यातील हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत. महामोर्चाला सुरुवात होण्याआधी ह.भ. प पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे जाहीर कीर्तन होणार आहे.