केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आज धाडमध्ये! खा.प्रतापराव जाधवांसाठी घेणार जाहीर सभा

 
धाड(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव जाधव यांचा झंझावती प्रचार सुरू आहे. ३ लोकसभा निवडणुकांचां अनुभव असल्याने खा.जाधव यांची प्रचारयंत्रणा जोमाने कार्य करत आहे. सुरुवातीपासून सुरू असलेला धमाकेदार प्रचाराचा टेम्पो शेवटच्या टप्प्यात देखील कायम आहे. आज चिखलीत सिनेअभिनेते गोविंदा खा. प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ रोड शो करणार आहेत. त्यानंतर धाड मध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब  दानवे यांची सायंकाळी भव्य जाहीर सभा होणार आहे.

आज सायंकाळी ६ वाजता धाड मध्ये केंद्रीय मंत्री दानवे यांची धाड मध्ये जाहीर सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार खा.प्रतापराव जाधव यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे आमदार देखील या जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. ही देशाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे, देशाच्या सुरक्षेची निवडणूक आहे, त्यामुळे या अस्तित्वाच्या लढाईसाठी होणाऱ्या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.