केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा जनता दरबार ; ऑन द स्पॉट सोडविल्या जनतेच्या समस्या..
Aug 12, 2024, 17:31 IST
बुलढाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) केंद्रीय आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या खासदार कार्यालयात बसून जनतेच्या तक्रारी समस्यां जाणून घेऊन ऑन द स्पॉट सोडविल्या केला......
Advt 👆
केंद्रीयमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीनिमित्त आले होते त्यावेळी खासदार महोदयांनी आलेल्या नागरिकांच्या तक्रारी, समस्या आणि अडचणी व इतर समस्या जाणून घेतल्या त्याचवेळी त्यांनी संबंधित यंत्रणेला दूरध्वनी वरून संपर्क साधून तात्काळ तक्रारींचे आणि समस्यांचे निराकरण केले तसेच विविध विकासात्मक कामासंदर्भात ही नागरिकांच्या सोबत चर्चा केली. आगामी काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन विकासात्मक बाबींवर चर्चाही केली. बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालयात आज जनता दरबाराचे स्वरूप प्राप्त झालं होते