केंद्रीय राज्यमंत्री ना. जाधवांनी सपत्नीक घेतले पांडुरंगाचे दर्शन! "सर्वांना दीर्घायुष्य आणि बळीराजासाठी चांगला पाऊस पडू दे" केली प्रार्थना..

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेतले. पवित्र आषाढी एकादशीच्या निमित्याने आयोजित केलेल्या शासकीय महापूजात ना. जाधव मुख्यमंत्री शिंदे सोबत उपस्थित होते. विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झाल्यावर ना. जाधव यांनी देशवासियांच्या निरोगी आरोग्यासाठी कामना केली तसेच बळीराजाला समृद्ध करणारा पाऊस पडू दे ! अशी ही प्रार्थना केली. 
 ना. प्रतापराव जाधव यांची विठ्ठल भक्ती असीम आहे. सलग चौथ्यांदा बुलडाणा जिल्ह्याचे खासदार बनल्यानंतर प्रतापराव जाधव देशाचे केंद्रीय आयुष मंत्री व आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदी विराजमान झाले. ना. प्रतापराव जाधव यांची या वेळची ही वारी ४१ वी होती. ना. जाधवांसाठी ही वारी विशेष ठरली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शासकीय पूजेला उपस्थित राहण्याचा मान त्यांना मिळाला.