केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आज बुलडाण्यात! वाचा कसा आहे दौरा...

 
Gadkari
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज,१८ ऑगस्ट रोजी बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत.

  नियोजित दौऱ्यानुसार आज सकाळी साडेदहा वाजता नितीन गडकरी यांचे मलकापूर येथील हेलिपॅड वर आगमन होईल. मलकापूर येथील जिव्हीएम मैदानावर त्यांच्या हस्ते नांदुरा ते शेळूद राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण होईल.  कार्यक्रम आटोपल्यानंतर ते बुलडाण्याकडे प्रयाण करतील. दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी येळगाव येथील सहकार विद्या मंदिराच्या हेलिपॅड वर त्यांचे आगमन होईल. १२ वाजून ५० मिनिटांनी गर्दे वाचनालयाच्या वतीने आयोजित बुलडाणा शहराचे माजी नगराध्यक्ष गोकुल शर्मा यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. दुपारी सव्वातीनला नितीन गडकरींच्या हस्ते सहकार विद्या मंदिराच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होईल. त्यानंतर दुपारी साडेचारला सहकार विद्या मंदिराच्या हेलिपॅड वरून ते नागपूर कडे प्रयाण करतील.