केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या बुलडाणा जिल्ह्यात! वाचा कसा आहे दौरा..!
Thu, 23 Feb 2023

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या,२४ फेब्रुवारीला बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. गडकरी हे धावती भेट देणार असले तरी त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
( जाहिरात👆)
नतीन गडकरी हेलिकॉप्टरने सकाळी सव्वाआठला शेगाव जवळ येतील. तेथून वाहनाने खामगाव येथे येथील. खामगाव येथील सतीश जळगावकर यांच्या निवासस्थानी ते सदिच्छा भेट देणार आहेत. त्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टरने नांदेडकडे रवाना होणार आहेत. उद्या, चिखली येथे भाजपची जिल्हा कार्यकारणीची बैठक आहे, मात्र असे असले तरी जिल्ह्यातील भाजप नेते सकाळी गडकरींच्या स्वागतासाठी खामगावात जमण्याची शक्यता आहे.