मोताळा तालुक्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद दिसली! तालुका बैठकीला भरगच्च उपस्थिती;नरेंद्र खेडेकर म्हणाले,बुलडाणा शिवसेनेचा बालेकिल्ला कायमच राहणार;

गद्दारांना निष्ठावंत धडा शिकवतील! जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत म्हणाले, उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी एकजुटीने काम करू...
 
Fcv
मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि "मातोश्री" च्या आशीर्वादाने अनेक वर्ष सत्ता भेटल्यानंतरही मातोश्रीसोबत गद्दारी करणाऱ्यांना निष्ठावंत शिवसैनिक निवडणुकीत धडा शिकवणारच आहेत. बुलडाणा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला जिल्हा आहे. तो कायमच राहणार आहे. लोकसभा आणि पाठोपाठ विधानसभा निवडणुका प्रत्येकाने पक्ष कार्यासाठी झोकुन देऊन काम करावे, सामान्य जनता देखील भक्कमपणे पाठीशी उभी राहील असे प्रतिपादन जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी केले. 
 शिवसेना (उ बा ठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार मोताळा तालुका शिवसेना (उ बा ठा) पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या प्रमुख उपस्थितीत काल, २ डिसेंबरला मोताळा येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात संपन्न झाली. याप्रसंगी व्यासपीठाव जिल्हा संघटिका चंदाताई बढे, जिल्हा संघटक सदानंद माळी, युवासेना जिल्हा प्रमुख नंदू कऱ्हाडे, उप जिल्हा प्रमुख सुनील घाटे, विधानसभा संघटक अशोक इंगळे, माजी तालुका प्रमुख वासुदेव बंडे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, अनंता दिवाणे, पं स माजी सभापती सुधाकर आघाव, डॉ .मधुसूदन सावळे यांची उपस्थिती होती. 
 
उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी एकजुटीने काम करू - जालिंदर बुधवत 
 
राजकारणातील देव माणूस म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिल्या जात आहे. एखादा व्यक्ती मुख्यमंत्री पदावरून राजीनामा देऊन बाजूला होत असेल किंवा पायउतार होत असेल तर तेव्हा फारशी गर्दी होत नाही. मात्र उद्धव साहेब जेव्हा "वर्षा" ते " मातोश्री" असा प्रवास करत होते. तेव्हा नागरिकांचे त्यांच्याबद्दलचे प्रेम दिसून आले. कोरोना काळामध्ये त्यांनी केलेले काम हे घराघरांमध्ये पोहोचलेले आहे. महाराष्ट्राची काळजी घेतलेले कुटुंब प्रमुख म्हणून सगळ्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आहे. काहींनी राजकीय स्वार्थापोटी वेगळी चूल मांडली. मात्र उद्धव साहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी आपण एकजुटीने काम करू असे आवाहन याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले. आगामी काळातील पक्षाची रणनीती, पक्ष संघटन मजबूत करणे, बूथ प्रमुखांचे कार्य, बि एल ए यांच्या नियुक्त्या या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला मोताळा तालुक्यातील शिवसेनेचे (उ बा ठा) शाखा प्रमुख, बूथ प्रमुख, आजी माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.