उध्दव ठाकरे, शरद पवार, मुकुल वासनिक उद्या खामगावात! प्रा.नरेंद्र खेडेकरांच्या विजयासाठी घेणार जाहीर सभा; महाविकास आघाडीला विजयाचा विश्वास..

 
खामगाव

खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गद्दार विरुद्ध खुद्दार या मुद्द्याभोवती गाजत असलेली बुलडाणा लोकसभेची निवडणूक रंगतदार वळणार आली आहे. प्रचारासाठी उद्यापासून अवघे ४ दिवस उरले आहेत. आधीपासूनच प्रचारात जोरदार आघाडी घेणाऱ्या नरेंद्र खेडेकरांच्या ताकदीत मोठी वाढ होणार आहे, कारण उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि जिल्हा काँग्रेसमध्ये ज्यांचा शब्द अंतिम समजल्या जातो असे मुकुल वासनिक नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी उद्या जिल्ह्यात येत आहेत. खामगाव येथील जे. व्ही.मेहता विद्यालयाच्या मैदानात उद्या प्रा. खेडेकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होणार आहे, ही सभा अभूतपूर्व, जंगी आणि निवडणुकीवर परिणाम करणारी ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

Advt.
Advt
Advt.👆
 उद्या,२१ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उध्दव ठाकरेंच्या प्रती प्रचंड सहानुभूतीची लाट राज्यभरात आहे. शरद पवार यांची एक सभा परिवर्तनाची ताकद ठेवून असते,असा इतिहास आहे त्यामुळे या दोन्ही नेत्यांसह मुकुल वासनिक यांना ऐकण्यासाठी उद्या प्रचंड गर्दी खामगाव शहरात होण्याची शक्यता आहे. प्रस्थापित नेत्याविरुद्ध असलेली लाट, खेडेकर यांच्या प्रचाराला गावोगावी मिळणारा प्रतिसाद पाहता खेडेकर यांच्या विजयाचा विश्वास महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. दरम्यान उद्या, खामगावात होणाऱ्या सभेच्या 
Advt
 अनुषंगाने आज जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला आहे.