उबाठा शिवसेनेच्या आंदोलनाने मोताळा दणाणले..! काय आहेत मागण्या? वाचा

 

मोताळा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज मोताळा तहसील कार्यालयावर धरणे करण्यात आले शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा, प्रधानमंत्री आवास योजनेत सुरु असलेल्या घरकुलांची रक्कम तात्काळ देण्यात यावी या सह इतर मागण्यासाठी आज सोमवार दिनांक २९ जुलै रोजी तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवात, जिल्हा संघटक प्रा सदानंद माळी, वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख संजय हाडे,  उप जिल्हा प्रमुख सुनील घाटे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, चंदाताई बढे, रामदास सपकाळ, शुभम घोंगटे, ओम बोर्डे यांच्या सह अनेक शेतकरी बांधव व युवा सेना, महिला आघाडी, किसान आघाडी व अपंग सेल चे पदाधिकारी उपस्थित होते. 

या आहेत मांगण्या 
• संपुर्ण कर्ज माफी द्या, •शेतमालाला हमी भाव द्या, • रासायनिक खते,औषधे,बी-बियाणे यांचे दर कमी करा, • जाचक अटी कमी करुन सरसकट शेतकऱ्यांना पिक विमा द्या, • रखडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पिएम किसान चा लाभ द्या, • दोन वर्षापासुन रखडलेले थिंबक सिंचन तुषार सिंचन चे अनुदान तात्काळ द्या, • महा डिबीडी वर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची सोडत प्रक्रिया पूर्ण करुन पुर्वसंमत्या द्या, • चक्रीवादळामुळे शेतामुळे पडलेले पोल डी.पी.तात्काळ सुरु करा, • मोदी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजनेत सुरु असलेल्या घरकुलांची रक्कम तात्काळ देण्यात यावी