BREAKING मेहकरात भाजपच्या दोन गटांत तुफान राडा ! तिघांचे डोके फुटले! लोखंडी रॉड आणि काठ्या चालल्या! भर पत्रकार परिषदेत झाला राडा; पहा थेट व्हिडिओ..
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर भाजपच्या विधानसभा संपर्क कार्यालयात आज तुफान राडा झाला. भाजपच्या दोन गटांत हा राडा झाला. भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांनी व माजी तालुकाध्यक्षांनी नवनियुक्त तालुकाध्यक्ष सारंग माळेकर, विधानसभा संपर्क प्रमुख प्रकाश गवई, अर्जुन वानखेडे यांच्यावर लोखंडी रॉड व लाठ्या काठ्यांनी हल्ला चढवल्याचे सांगण्यात येत आहे. यात तिघांचेही डोके फुटले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दोनच दिवसाआधी मेहकर भाजपच्या गटबाजी संदर्भात बुलडाणा लाइव्ह ने वृत्त प्रकाशित केले होते. भाजपच्या जिल्हाध्यक्षांची मेहकर तालुकाध्यक्ष म्हणून सारंग माळेकर यांची नियुक्ती केली असताना जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद लष्कर यांनी तालुकाध्यक्ष म्हणून जुने तालुकाध्यक्ष ॲड शिव ठाकरे यांची नियुक्ती केली होती. नियुक्तीचे अधिकार आम्हाला प्रदेशातून मिळाल्याचे प्रल्हाद लष्कर म्हणाले होते, शिवाय त्यांनी जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मांटे मनमानी नियुक्त्या करीत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान आज भाजपच्या विधानसभा संपर्क कार्यालयात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.प्रशांत राठोड, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे, तालुकाध्यक्ष सारंग माळेकर हे पदाधिकारी भाजपा कार्यालयात उपस्थित होते. काही पत्रकार देखील पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते.त्यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद अण्णा लष्कर, माजी तालुकाध्यक्ष ॲड शिव ठाकरे यांच्यासह १५ ते २० जण भाजपा कार्यालयात घुसले.."आम्ही १५ -२० वर्षांपासून इथे आहोत, तुम्ही आत्ताचं आले, इथून उठा" असे जुने पदाधिकारी दुसऱ्या गटाला उद्देशून बोलत होते.
यातून वाद वाढत जाऊन प्रल्हाद लष्कर यांच्या गटाने दुसऱ्या गटावर तुफान हल्ला चढवला.. लाठ्या व लोखंडी रॉडने , चापटा बुक्क्यांनी मारहाण केली..यात काही तिघांचे डोके फुटल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ बुलडाणा लाइव्ह कडे असून बुलडाणा लाइव्ह च्या युट्यूब चॅनल वर तो पाहता येईल....