तुपकरांच्या निर्धार यात्रेला बुलडाणा तालुक्यात तुफान प्रतिसाद! रविकांत तुपकर म्हणाले, जिल्ह्यात प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज..!

 
Tupkat
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एक नव्हे तर दोन छत्रपती घडविणाऱ्या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊंचा जिल्हा म्हणून बुलढाणा जिल्ह्याकडे पहिले जाते. परंतु मातृतीर्थ जिल्ह्यात विकासाची वानवा आहे. कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग जिल्ह्यात होणे आवश्यक आहेत. यातून शेतकऱ्यांचे भले होईल, तसेच तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार देखील मिळेल. परंतु लोकप्रतिनिधींनी याकडे जराशेही लक्ष दिले नाही हे जिल्ह्याचे मोठे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी बोलताना केले. सध्या रविकांत तुपकर यांचे निर्धार यात्रा बुलढाणा तालुक्यात सुरू असून या निर्धार परिवर्तन प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
            
 निर्धार परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने १० मार्च रोजी बुलढाणा तालुक्यातील पांग्री, रायपूर व सिंदखेड या गावांमध्ये अ‍ॅड. शर्वरीताई रविकांत तुपकर यांनी दौरा करून ग्रामस्थांसोबत संवाद साधला. तर रविकांत तुपकरांनी मातला, केसापूर, माळवंडी, घाटनांद्रा, दुधा, चिखला, हतेडी बु., ढालसावंगी, दहीद खुर्द याठिकाणी भेटी देऊन सभांना संबोधित केले. यावेळी जेसीबीने पुष्पवृष्टी करून गावकऱ्यांनी वाजतगाजत तुपकरांचे स्वागत केले. त्यानंतर हतेडी बु., ढालसावंगी व दहीद खुर्द येथील सभांना गावकऱ्यांनी गर्दी केली होती. यावेळी बोलतांना रविकांत तुपकर म्हणाले की निर्धार परिवर्तन यात्रेला सर्वच ठिकाणी लोकांचा भरभरून प्रतिसाद व प्रेम लाभत आहे. नागरिकांचा हा उत्साह पाहून लढण्याची प्रचंड ऊर्जा प्राप्त होत आहे. येणारी लोकसभा निवडणूक ही निर्णायक आहे. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक आणि तरुणांचा आवाज देशाच्या संसदेत पाठवण्याची ही सुवर्णसंधी आहे. गेल्या २२ वर्षात चळवळीत झोकुन देऊन केलेल्या कार्याची मी परतफेड मागत नाही, तर या निमित्ताने आणखी काम करण्याची संधी मागत आहे. आपला बुलढाणा जिल्हा हा राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊंचा जिल्हा आहे. संत गजानन महाराजांची पावनभूमी आहे, जागतिक दर्जाचे लोणार सरोवर आहे. जिल्ह्याचा पर्यटन विकास, कृषी विकास, सिंचन विकास, ग्रामीण विकास, औद्योगिक विकास खुंटलेला आहे. शेतकऱ्यांच्या मालावर कृषी प्रक्रिया करणारे प्रकल्प जिल्ह्यात उभे राहिले तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल तसेच सुरक्षित बेरोजगारांना रोजगार देखील मिळेल, त्यामुळे जिल्ह्यात तातडीने कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज आहे, यासाठी आपण प्रयत्न करू, असे यावेळी बोलतांना रविकांत तुपकर यांनी सांगितले.
           यावेळी डॉ.विनायक वाघ, पवन देशमुख, आकाश माळोदे, सदाशिव जाधव, अ‍ॅड.राज शेख, मोहम्मद अझहर, संदीप मुळे, अमोल मोरे, नेहरूसिंग मेहर, निलेश राजपूत, दगडू साखरे, इलियास सौदागर, समाधान नागवे, पुरुषोत्तम पालकर, सचिन सिरसाट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.